संजय लिला भंन्साळी यांची चैाकशी होणार...

येत्या दोन दिवसात चैाकशीसाठी हजर राहण्याची नोटिस मुंबई पोलिसांनी संजय लिला भंन्साळी यांना बजावली आहे.
Sanjay Leela Bhansali.
Sanjay Leela Bhansali.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येला दोन आठवडे झाले आहेत. पोलिसांनी याप्रकऱणी आत्तापर्यंत 28 जणांची चैाकशी केली आहे. सुशांत सिंह याच्या व्यक्तीगत आणि चित्रपट क्षेत्रातील संबधित काही व्यक्तींची चैाकशी सुरू आहे. आता मुंबई पोलीस प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता संजय लिला भंन्साळी यांची चैाकशी करणार असल्याचे समजते. येत्या दोन दिवसात चैाकशीसाठी हजर राहण्याची नोटिस मुंबई पोलिसांनी संजय लिला भंन्साळी यांना बजावली आहे. 

संजय लिला भंन्साळी यांच्या  'गोलियों की रासलीला राम-लीला' आणि 'बाजीराव मस्तानी' या दोन चित्रपटात सुशांत सिंह काम करणार होता. पण नंतर त्याला या चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर सुशांत सिंह हा नैराश्यात गेला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. संजय लिला भंन्साळी यांनी सुशांत सिंह याला आपल्या चार चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती.

सुशांत सिंह आणि संजय लिला भंन्साळी यांचं नातं चांगलं होतं, असे सांगण्यात येत आहे. यशराज फिल्मचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांना देखील पुन्हा एकदा चैाकशीसाठी बोलविण्यात आले आहे. यापूर्वी 28 तारखेला शानू शर्मा यांची चैाकशी बांद्रा पोलिसांनी केली आहे.  

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय लिला भंन्साळी, शानू शर्मा यांच्या चैाकशीबरोबरच चित्रपट निर्माता शेखर कपूर आणि अभिनेत्री कंगना राणावत यांचीही चैाकशी होणार आहे. याबाबत त्यांना पोलिसांनी नोटिस पाठविली आहे. सुशांत सिंह यांच्या आत्महत्येबाबत शेखऱ कपूर आणि कंगना राणावत यांनी सोशल मीडिया आणि अन्य मुलाखतीमध्ये याबाबत आपले मत व्यक्त केले होते, याबाबतच त्यांची चैाकशी पोलिस करणार आहेत. शेखर कपूर हे सुशांत सिंह यांच्या जवळील व्यक्तीपैकी एक आहेत. सुशांत सिंह आपल्या अनेक गोष्टी शेखर कपूर यांना शेअर करीत असे. 

शेखर कपूर यांनी आपल्या टि्वटमधून याबाबत काही माहिती पोस्ट केली होती. याबाबत पोलिस शेखर कपूर यांची चैाकशी कऱणार आहेत. शेखर कपूर यांच्या 'पानी' हा चित्रपट यशराज फिल्म करणार होता. या चित्रपटात सुशांत सिंह मुख्य भूमिका करणार होता. पण काही कारणामुळे हा चित्रपट तयार होऊ शकला नाही. याबाबत शेखर कपूर यांनी काही पोस्ट शेअर केल्या आहेत.

यापूर्वी सुशांत सिंह याची जवळीची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिची दहा तास बांद्रा पोलिसांनी चैाकशी केली आहे. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबड़ा, अभिनेत्री संजना सांघी , महेश शेट्टी, रोहिणी अय्यर यांची यापूर्वी चैाकशी करण्यात आली आहे. अभिनेता आदित्य चोपड़ा आणि करण जौहर यांनाही पोलिस चैाकशीसाठी बोलविण्याची शक्यता आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com