कोरोना रुग्णांना दिलासा : रेमडिसिवरच्या किमतीत 30 ते 70 टक्क्यांनी घट! 899 रुपयांनाही मिळणार!! - MRPs of Remdisiver injection reduced by 40 to 70 percents | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

कोरोना रुग्णांना दिलासा : रेमडिसिवरच्या किमतीत 30 ते 70 टक्क्यांनी घट! 899 रुपयांनाही मिळणार!!

वृत्तसंस्था
शनिवार, 17 एप्रिल 2021

रेमडिसिवरच्या पुरवठ्याचा प्रश्न कधी संपणार हा आता प्रश्न

पुणे : रेमडिसिविर इंजेक्शनसाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत असताना आणि त्यावरून राजकारण सुरू असताना दुसरीकडे एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे. या इंजेक्शनच्या एमआरपीमध्ये (MRP Price)  30 ते 70 टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याबाबत केंद्र सरकारच्या रसायने आणि खते विभागाच्या औषधनिर्माण विभागाचे सदस्य सचिव विनोद कोतवाल यांनी हा आदेश जारी केला आहे. केंद्र सरकारने औषध कंपन्यांसोबत बोलणी केल्यानंतर स्वेच्छेने या किमती कमी करण्याचे औषध कंपन्यांनी ठरविल्याचे यात म्हटले आहे. कॅडिला हेल्थकेअरचे इंजेक्शन सर्वात स्वस्त म्हणजे 899 रुपयांना मिळू शकेल. सध्या या इंजेक्शऩच्या नावाखाली रुग्णांची लूट सुरू असून बनावट औषधे चढ्या भावाने विकली जात आहेत. या औषधाच्या जुन्या बाटल्यांत पॅरासिटामाॅल भरून ते तब्बल 35 हजार रुपयांना विकल्याचा प्रकार बारामतीत पोलिसांनी उघडकिस आणला. पुरवठा वाढल्यानंतर हे प्रकार थांबतील. पण सध्या तरी कंपन्यांनी किमती कमी केल्या आहेत. 

नवीन दर कंपनीनिहाय पुढीलप्रमाणे राहतील....  

कॅडिला हेल्थकेअर ( ब्रॅंड- रेडमॅक) - जुनी किंमत 2800- नवी किंमत 899 रुपये

सिंजेन-बायोकाॅन (ब्रॅंड-रेमविन)- जुनी किंमत- 3950 - नवी किंमत 2450 रुपये

रेड्डीज लॅबरोटरीज (ब्रॅंड- रेडYX)- जुनी किंमत- 5400- नवी किंमत- 2700 रुपये

सिप्ला लिमिटेड (ब्रॅंड- सेप्रेमी)- जुनी किंमत 4000 - नवी किंमत 3000 रुपये

मायलेन (ब्रॅंड) - (ब्रॅंड- डेसरिम)- जुनी किंमत 4800- नवी किंमत 3400 रुपये

ज्युबिलिअंट जेनेरिक्स (ब्रॅंड- ज्युबी- R)- जुनी किंमत 4700 - नवी किंमत 3400

हेट्रो हेल्थकेअर (ब्रॅंड- कोव्हीफोर)- जुनी किंमत 5400- नवी किंमत 3490 रुपये

 

 

महाराष्ट्राला रोज 55 हजार रेमडिसिविरची इंजेक्शन रोज आवश्यक असतात. पण सध्या पुरवठा हा 30 ते 35 हजार इतकाच होत आहे. निर्यातबंद केलेल्या गुजरातमधील कंपन्यांमधून ही इंजेक्शने एक-दोन दिवसांत मिळणे अपेक्षित होते. मात्र गुजरात सरकारने राज्याबाहेर ही औषधे विकण्यास बंदी घातल्याने महाराष्ट्रातील टंचाई लवकर संपण्याची लक्षणे दिसत नाहीत. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर आरोप केले आहेत. त्याला भाजपने प्रत्युत्तर दिले असून निर्लज्ज राजकारण उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला. तसेच मलिक यांनी या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले. यावरून मलिक यांनी गुजरात सरकारचा आदेशच ट्विटरवरून जारी केला.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख