खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण

उदयनराजे यांच्या आई राजमाता कल्पनाराजे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
034Udayanraje_Satara3_final_0_0.jpg
034Udayanraje_Satara3_final_0_0.jpg

सातारा : खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanraje Bhosale) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील घरी उपचार सुरू आहेत. (MP Udayanraje Bhosale contracted corona) उदयनराजे यांच्या आई राजमाता कल्पनाराजे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांची तब्बेत बरी आहे. 

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन आटोपून पुणे येथे आल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.  उदयनराजे भोसले अधिवेशन सोडून परतले होते. चार दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.  

 
उदयनराजे भोसले यांनी कोरोनाच्या काळात दुकाने सुरु करावीत तसेच लोकांची विनाकारण अडवणूक करु नये, यासाठी भीकमांगो आंदोलन केले होते. कोरोनाच्या काळात प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेलाही त्यांनी विरोध केला होता. दरम्यानच्या काळात उदयनराजे भोसले यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आली होती. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना पुढील काही दिवसात डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  

मुंबई :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या सीबीआय तपासात राज्य सरकार सीबीआयला CBI सहकार्य करण्यास तयार आहे; मात्र या प्रकरणाशी संबंध नसलेल्या कागदपत्रांची मागणी सीबीआय करीत आहे, असा दावा राज्य सरकारने Uddhav Thackeray मंगळवारी प्रतिज्ञापत्रात केला. सीबीआयने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. राज्य सरकार तपासात सहकार्य करीत नसून अधिकाऱ्यांना धमकावत आहे, अशी तक्रार यात केली आहे. या आरोपांवर खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने काल प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com