एक दिवस फडणवीस "मातोश्री"वरही येतील... - MP Sanjay Raut criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

एक दिवस फडणवीस "मातोश्री"वरही येतील...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 जून 2021

राजकारणात वैचारिक मतभेद असतात, पण कोणी कोणाचा शत्रू नसतो.

मुंबई : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याघरी गेले होते. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. फडणवीस यांच्या या भेटीबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसाना टोला लगावला आहे. राऊत आज माध्यमांशी बोलत होते.MP Sanjay Raut criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis 

संजय राऊत म्हणाले की, फडणवीस यांनी पवारांची भेट घेतली, हे चांगले आहे, विरोधी पक्ष आता हळूहळू जमिनीवर येत आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असतात, पण कोणी कोणाचा शत्रू नसतो. महाराष्ट्राची ही परंपरा आहे. फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या घरी गेले असतील, तर त्यांचे स्वागत आहे. एकमेकांकडे जात राहिलं पाहिजे. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. कशाला धुरळा उडवता ?, असंही टोलाही राऊतांनी लगावला. 

 
मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट महाविकास आघाडी सरकार घालत असल्याचा आरोप विरोधक करीत आहे. यावर राऊत म्हणाले की निवडणुकीची विरोधी पक्षाला एवढी घाई कशासाठी झाली आहे. त्यांची माहिती चुकीची आहे. निवडणुकाबाबात निवडणुक आयुक्त, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हेच अधिकारवाणीने सांगू शकतील, असे राऊत म्हणाले. 

तोल ढासळलेल्या चंद्रकांतदादांवर उपचारांची गरज...राऊतांचा पलटवार
 
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर देऊन त्यांच्यावर पलटवार केला आहे. आज ते माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या  लग्नासाठीसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील, असा टोमणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल लगावला. त्यावरुन  राऊतांनी पाटलांवर निशाणा साधला आहे. चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, तोल ढासळणाऱ्या व्यक्तीबाबत बोलणं बरोबर नाही, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर केली. तुम्हीच म्हणालात ना चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे. मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं. त्यांच्यावर उपचाराची गरज असते, असा टोला राऊत यांनी लगावला.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख