Maratha Reservation : खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलनात दाखल..  - MP Dhairyashil Mane participates in the agitation with saline | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

Maratha Reservation : खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलनात दाखल.. 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 जून 2021

आंदोनलनात महाविकास आघाडीतील अनेक नेतेही सहभागी होणार आहेत.

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास प्रारंभ झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या आंदोलनास उपस्थित आहेत.  खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलन ठिकाणी दाखल झाले आहेत. मराठा समाजासाठी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी उपस्थित राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. धैर्यशील माने नुकतेच कोरोना निगेटिव्ह झाले आहेत MP Dhairyashil Mane participates in the agitation with saline

आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना उलटसुलट न बोलण्याचं आवाहन संभाजीराजेंनी काल मराठा आंदोलकांना केलं आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली सुद्धा जाहीर केली आहे.  दुपारी संभाजी राजे समन्वयकांना मार्गदर्शन करणार आहेत. सहा जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. आजच्या आंदोनलनात महाविकास आघाडीतील अनेक नेतेही सहभागी होणार आहेत. 

संभाजीराजे यांनी पुण्यात उदयनराजे यांचीही भेट घेतली. ही भेटही ऐतिहासिक ठरली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट संभाजीराजेंनी घेतली आहे. त्यांनी सरकारपुढे काही प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. पण अद्याप सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने ते आजपासून आंदोलनाला सुरूवात झाली.

आंबेडकर, माने आंदोलनात सहभागी..चंद्रकांत पाटलांनी दिलं पाठिब्याचं पत्र..
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आज मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे कोल्हापुरात दाखल झाले आहे. या आंदोलनाला सहभागी होण्यासाठी काल आंबेडकर यांनी टि्वट केलं होतं. आंबेडकरांनी शाहू महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, खासदार धैयशील माने आंदोलनात सहभागी झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना पाठिंब्याचे पत्र दिलं आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख