कृषी कायद्यांबाबत दोन्ही काँग्रेसचं धोरण दुटप्पी... 

दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावर्तीने धरणे आंदोलनं करण्यात आले.
4Sarkarnama_20Banner_20_2818_29_5.jpg
4Sarkarnama_20Banner_20_2818_29_5.jpg

मुंबई : दिल्ली मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून केंद्र सरकारने केलेल्या कृषी विरोधी तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर वंचित बहुजन आघाडीच्यावर्तीने आज धरणे आंदोलनं करण्यात आले.

राष्ट्रवादी व कोंग्रेसच्या युती सरकारने २००६ मध्ये महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विनिमय व विनिमय सुधारणा) कायदा केला आहे. केंद्राचा आजचा काळा कायदा हा याच कायद्यावर आधारित आहे. म्हणून राष्ट्रवादी व काँग्रेस युती सरकारने २००६ साली केलेला कृषी कायदा रद्द झाला पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने आजच्या धरणे आंदोलनाद्वारे केली आहे. 


कृषी हा राज्याचा विषय आहे व त्यामुळे केंद्र सरकारला कृषी कायदा करता येत नाही. परंतु एखाद्या राज्याने कृषी कायदा केला तर तो योग्य आहे, या सबबी खाली तो संपूर्ण देशभर लागू केला जाऊ शकतो. वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या आंदोलनाची हि मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठराव करावा की, “महाराष्ट्र हा कायदा तर स्वीकारणार नाहीच व केंद्र सरकानेही हा कायदा मागे घ्यावा”.


राष्ट्रवादी व कॉंग्रेस या दोघांचे या कायद्या बाबतीतील विरोधाचे धोरण हे दुटप्पी आहे. २००६ मध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रसने केलेला कायदा आज भारत सरकारने लागू केला आहे. ही गोष्ट आम्ही लोकांसमोर आम्ही आणू इच्छितो, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

हेही वाचा : काँग्रेसचे आमदाराने विधानसभेतच काढला शर्ट...

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवशी एका आमदाराने धोरणाचा निषेध करण्यासाठी चक्क विधानसभेत शर्ट काढल्याने उपस्थित सदस्यांच्या भुवया उंचावल्या. या आमदाराला सात दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. सभागृहातील सदस्य 'एक देश -एक निवडणूक' या मुद्यावर चर्चा करती होते. याला विरोध करण्यासाठी या आमदारांनी शर्ट काढून राज्य सरकारच्या धोरण्याच्या निषेध केला. अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचा काँग्रेसचे सदस्य विरोध करत असताना भ्रदावतीचे काँग्रेसचे आमदार बी. के. संगमेश यांची हा प्रकार केला. यामुळे काँग्रेसच्या आमदारांसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. 

कर्नाटकच्या विधानसभेत चर्चेदरम्यान काँग्रेसचे भद्रावतीचे आमदार बी. के. संगमेश सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या आमदारांसोबत आले. घोषणाबाजी करता करता संगमेश यांनी अचानक विधानसभेत अध्यक्षासमोर शर्टच काढला. हा प्रकार पाहून विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कगेरी यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काँग्रेसच्या आमदारांना नियंत्रणात ठेवण्याची विनंती केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com