अमोल मिटकरी दिसले की त्यांना फोडून काढणार ; मनसे आक्रमक
Sarkarnama (6).jpg

अमोल मिटकरी दिसले की त्यांना फोडून काढणार ; मनसे आक्रमक

अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसे आता आक्रमक झाली आहे.

नागपूर  : ''राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला,' असं वक्तव्य करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackerayयांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सल्ला दिला होता. ''राज ठाकरे यांनी आधी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं. हे लिखाणचं त्यांना योग्य रस्ता दाखवेल,'' असं पवार म्हणाले. यावर राज ठाकरे यांनीही पवारांना प्रतिउत्तर दिलं आहे. या विषयावरुन आता मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले आहे. 
 
राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार अमोल मिटकरी  Amol Mitkari यांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसे आता आक्रमक झाली आहे. मनसेनेचे नेते जगदीश खांडेकर  Jagdish Khandekar यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अमोल मिटकरी यांना इशारा दिला आहे. ‘राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. अमोल मिटकरी यांना खांडेकर यांनी इशारा दिला आहे. जगदीश खांडेकर म्हणाले की, तुम्ही नागपूर येताना गाडीच्या काळ्या काचा करुन येतात, आता त्या अधिक काळ्या करुन या नाहीतर आमने मनसैनिक या काच्या फोडून काढतील .

खांडेकर म्हणाले, "राष्ट्रवादीने दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय असा व्देष निर्माण केला ती राष्ट्रवादी आरोप करीत आहे.राष्ट्रद्रोह म्हणजे काय हे त्यांनी अगोदर शिकून घ्यावे, कारण एखादी व्यक्ती राष्ट्रद्रोही आहे की नाही हे भारतीय संविधान ठरवेल. तुम्ही कोण ठरविणार. राज साहेबांच्या व्यक्तीमत्वावर बोलण्याची तुमची एवढी लायकी नाही. तुमचं तोंड बंद ठेवा. नाहीतरी आम्ही तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा राज साहेबांवर टीका केली तर पुढची जबाबदारी तुमची.""
 
ठाकरे यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना याविषयीची भूमिका पुन्हा सविस्तरपणे मांडली. मी जे बोललो त्याचा प्रबोधनकार ठाकरे माझे आजोबा यांच्या पुस्तकांचा काय संबंध होता ते मला सांगा. अजूनही आपण जातीपातीत खितपत पडलोय. जात ही गोष्ट शतकानुशतके आहे. सगळीकडेच आहे. मात्र 99 सालापासून जातीपतींचा द्वेष वाढला आणि राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर वाढला, हे सगळ्यांना माहितीय. सर्व पक्षांना माहितीय. मी फक्त बोललो. प्रबोधनकारांची सर्व पुस्तके मी वाचली आहेत. त्यांचे विचार त्या त्या कालानुसार होते, प्रबोधनकारांचे विचार पाहिजे ते घ्यायचा आणि बाकीचं सोडून द्ययाच असं सुरु, असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाने मोर्चे काढले, त्यांना आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्टपणे सांगा त्यांना. या मुद्यावरून माथी भडकवून, निवडणुकीला मतं मिळतात त्यापलीकडे दुसरं काही सुरू नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
   Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.