अॅमेझॉन, फ्लिपकार्टला मनसेचा इशारा.. अॅपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करा - MNS warning to Amazon Flipkart  Add Marathi language in the app | Politics Marathi News - Sarkarnama

अॅमेझॉन, फ्लिपकार्टला मनसेचा इशारा.. अॅपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

अॅपमध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव केला नाही, तर त्यांचा मनसे स्टाइल समाचार घेण्यात येईल, असा इशारा मनसेले दिला आहे.  

मुंबई : अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ड या दोन कंपन्यांनी सात दिवसाच्या आत जर त्यांनी त्यांच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव केला नाही, तर त्यांचा मनसे स्टाइल समाचार घेण्यात येईल, असा इशारा मनसेले दिला आहे.  

ज्याप्रमाणे या कंपन्यांनी  दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य देऊन तिथे त्यांच्या भाषेत अॅप सुरू केले, तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत अॅप आणावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा दिवाळीचा सण मनसे स्टाईल साजरा करेल,  असा इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ड या दोन कंपन्यांना सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे. 

कामगार सेनेचे सचिन गोळे यांनी देखील अमेझॉनला माफी मागण्यास सांगितले होते. अॅपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करण्यासाठी आठवड्याची मुदत देखील दिली आहे. अखिल चित्रे यांनी देखील अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ला खळखट्याक चा इशारा दिला आहे

हेही वाचा : केंद्र सरकार शेतकरी विरोधीच 

वर्धा : "सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर यांना भूलथापा देत आणि स्वतःला शेतकऱ्याच्या बाजूचे म्हणून सत्ता स्थापन केलेले केंद्र सरकार हेच खरे शेतकरी विरोधक आहेत," असा आरोप महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केला.

नुकत्याच मंजुर झालेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात आयोजित व्हर्चुअल रॅलीत केदार यांनी हा आरोप केला. संपूर्ण देशात ज्या शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध होत असतांना केंद्र सरकार मात्र अजूनही गप्प आहे. त्यांना शेतकऱ्यांचा अश्रूंशी काहीही घेणे नाही, असे सुनील केदार म्हणाले. एकीकडे शेतकऱ्यांचे पालनहर म्हणून सत्ता हस्तगत करायची आणि नंतर मात्र त्याच शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचे असा मूलमंत्र केंद्र सरकार सध्या अवलंबवत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख