अमित, मिताली ठाकरेंवर टीका करणारे वरूण सरदेसाई ट्रोल...

वरूण सरदेसाई यांनी केलेल्या या टि्वटवरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
amit29f.jpg
amit29f.jpg

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज बैठक झाली. बैठकीला पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह त्यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे उपस्थित होते. पण, अमित ठाकरे यांच्या पत्नी आणि राज ठाकरे यांच्या सून मिताली यांनी यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

यावरून युवासेनेचे चिटणीस वरूण सरदेसाई यांनी टि्वट करीत मनसेवर टीका केली  आहे. सरदेसाई यांनी या बैठकीची बातमी टि्वट करीत 'शॅडो' चे पण 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' असं म्हटलं आहे. वरूण सरदेसाई यांनी केलेल्या या टि्वटवरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. 

"अहो वरुण सरदेसाई लहान मुलांसारख काय रडताय..मिताली ठाकरे या मनसे पक्षाच्या खासगी बैठकीला उपस्थित होत्या.. तुमच्या सारखं मंत्रालयात कोणत्या सरकारी बैठकीत बसल्या नव्हत्या.. थोडा तरी विचार करून बोलत जा," असे स्नेहल सुधीर पारकर यांनी म्हटलं आहे. 

सुमीत बने म्हणतात, "आता तुमच्या युवराजांच्या हाताशी दिशा नाही म्हणुन दुसऱ्यांना बोलायचं का ? धर्मपत्नी आणि पोऱ्या फिरणाऱ्या मध्ये फरक असतो काय लहान पोरं सारखे वागतात."

"माहिती घेवून बोलत जा, खासगी बैठकीला उपस्थित राहणे नी मंत्रालयात कुठलंही पद नसताना मावशीच्या मुलाच्या मागे लागून बैठकीत बसणे ह्यात फरक आहे. बाकी तुझ चालू दे...दुसऱ्याचे कपडे सांभाळायचंच काम तुला आयुष्यभर करायचं आहे...त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.." असे मराठी बाणा असे टि्वटर हॅडल असलेल्या व्यक्तीनं म्हटलं आहे.

हेही वाचा : 'मनसे खंडणी' असे फक्त google search करा.. 
 मुंबई : मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. आजच्या मनसेच्या बैठकी पूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली होती. संदीप देशपांडे यांनी टि्वट करून शिवसेनेवर निशाणा साधला होता. याला युवासेनेचे चिटणीस वरूण सरदेसाई यांनी शिवसेनेच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. याबाबत वरूण सरदेसाई यांनी टि्वट करून मनसेवर टीका केली आहे. सरदेसाई टि्वटमध्ये म्हणतात, "खरे वीरप्पन कोण हे जनतेला चांगलेच माहिती आहे. आपल्याला पण माहित करून घ्यायचे असेल तर 'मनसे खंडणी' असे फक्त google search करून बघावे. Google च्या पहिल्याच पेज वर ह्या बातम्या सापडतील."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com