उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे आभार मानायला हरकत नव्हती..मनसेचा टोला - MNS leader Sandeep Deshpande taunts CM Uddhav Thackeray over Haffkine vaccine Raj Thackeray  | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे आभार मानायला हरकत नव्हती..मनसेचा टोला

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 एप्रिल 2021

शिवसेना आणि मनसे याच्यात श्रेयावरून शाब्दीक युद्ध सुरू झाले आहे.

मुंबई : राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी लशीकरण मोहीम वेगाने राबवावी, यासाठी लशींचा तुटवडा होऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना Narendra Modi पत्र लिहिले होते. हाफकिंगसारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज ठाकरे Raj Thackeray यांनी केली होती. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून हाफकिंगला परवानगी देण्याचा प्रस्ताव दिला होता. काल केंद्र सरकारने हाफपकिंग संस्थेला लस उत्पादन करण्याची परवानगी दिली आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी याबाबत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहे. मात्र, या परवानगीवरून आता शिवसेना आणि मनसे याच्यात श्रेयावरून शाब्दीक युद्ध सुरू झाले आहे. शिवसेनेचे नेते संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांनी याबाबत टि्वट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आपल्या टि्वटमध्ये संदीप देशपांडे म्हणतात की, राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिंग ला लस बनवण्याची   परवानगी  देण्याचा प्रस्ताव पाठवला होता.पण त्याची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली याला म्हणतात "ठाकरे ब्रँड".करोना काळात "राजकारण" नको म्हणण्याऱ्यानी आभार मानायला हरकत नव्हती.

''शंभर टक्के लशीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की,''असे टि्वट काल राज ठाकरे यांनी केलं होते.  

हेही वाचा : कृपया, आम्हाला मदत करा! अदर पूनावालांचे थेट अमेरिकेच्या अध्यक्षांना साकडे
 
नवी दिल्ली : देशात कोरोना लशीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यातच अमेरिका आणि युरोपने कोरोना लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल रोखून धरला आहे. यामुळे लशीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी थेट अमेरिकेच्या अध्यक्षांकडे मदतीची याचना केली आहे. अदर पूनावाला यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे आदरणीय अध्यक्ष, आपण सर्वांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करीत आहे. अमेरिकेने लशीच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर घातलेले निर्बंध उठवावेत. असे घडल्यास लस उत्पादनाचा वेग वाढेल. तुमच्या प्रशासनाकडे यासंदर्भातील सर्व तपशील आहेत.  

Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख