पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता? नांदगावकरांचा सरकारला टोला  - MNS leader Bala Nandgaonkar criticizing the state government over the temple issue. | Politics Marathi News - Sarkarnama

पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता? नांदगावकरांचा सरकारला टोला 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून राज्य सरकारवर मंदिराच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता?, असा सवाल नांदगावकर यांनी केला आहे.  

मुंबई : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून राज्य सरकारवर मंदिराच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता?, असा सवाल नांदगावकर यांनी केला आहे.  हा केवळ भावनेचा प्रश्न नाही तर मंदिरावर अवलंबून असणाऱ्या हजारो व्यावसायिकांच्या रोजीरोटीचाही प्रश्न आहे, असं नांदगावकरांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

बाळा नांदगावकर यांनी मंदिर उघडण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहे. ते नांदगावकर आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की पुनःश्च हरी ॐ म्हणता व "हरी"ला च कोंडून ठेवता. बार उघडले, मग बार ची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्स ला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क (Logic)  असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे.

बाळा नांदगावकर यांनी गुटखा बंदीवर टि्वट केले आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की केंद्र सरकारने गुटखाची निर्मिती व विक्रीवर संपूर्ण देशात बंदी आणावी, कारण महाराष्ट्र सारख्या राज्यात गुटखा विक्रीची बंदी असतांना देखील दुसऱ्या राज्यातून अनेक मार्गांद्वारे येऊन तो सहजरित्या उपलब्ध होतो. तसेच याचे सेवन करणारे सार्वजनिक ठिकाणी थुंकून लोकांच्या आरोग्याला देखील घातक ठरतात.

हेही वाचा : मंदिरे उघडलीच पाहिजे अशा प्रकारचा हट्ट का ? 
मुंबई : मंदिरे सुरू करायची असतील तर कशाप्रकारची रचना पाहिजे, त्याच्यावर चर्चा करता येईल तुम्ही पुढे या आम्ही सरकारला सांगू... एकत्र बसून ठरवू परंतु मंदिरे उघडलीच पाहिजे अशा प्रकारचा हट्ट का? इतर लोक येवून चर्चा करतात तर तुम्हाला चर्चा करायला अडचण का वाटते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमंत टकले यांनी भाजपला केला आहे. भाजपच्या तथाकथित अध्यात्मिक आघाडीने तुळजापूर आणि पंढरपूर येथे मंदिरे उघडण्याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावर माजी आमदार हेमंत टकले यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत मांडले आहे.

मंदिरे, धार्मिक स्थळे उघडली पाहिजेत. मस्जिद, चर्च, गुरुद्वारा हे धार्मिक अधिष्ठान असलेले वेगवेगळे समुह आहेत. परंतु याचा राजकारणाशी जोडण्याचा काय संबंध... जेव्हा एखाद्या राज्यातील प्रशासन संभाव्य परिणामांचा अभ्यास करून काही गोष्टींबद्दल टप्प्याटप्प्याने निर्णय घेत असते. त्यामुळे उगाचच अगावूपणे अशाप्रकारची आंदोलने करून काय मिळते, असा सवालही हेमंत टकले यांनी भाजपला केला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख