सत्ता त्यांच्या हातात आहे..म्हणून मस्ती आहे..नांदगावकरांचा शिवसेनेवर आरोप  - MNS leader Bala Nandgaonkar allegation against Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

सत्ता त्यांच्या हातात आहे..म्हणून मस्ती आहे..नांदगावकरांचा शिवसेनेवर आरोप 

अजय दुधाणे
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

राकेश पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मनसे नेता बाळा नांदगावकर आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी भेट घेतली.

अंबरनाथ : बुधवारी सायंकाळी अंबरनाथ मधील पाले गावात असलेल्या पटेल आर मार्ट या शॉपिंग मॉल बाहेर उभे असलेले अंबरनाथ शहरमनसेचे उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. 

आज राकेश पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मनसे नेता बाळा नांदगावकर आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी भेट घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते पाटील यांच्या घराबाहेर जमा झाले होते. नांदगावकर पाटील कुटुंबियांशी चर्चा करून कल्याण येथे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांना भेटण्यासाठी रवाना झाले. राकेशच्या  हत्येने त्याचे कुटुंब पोरके झाले असून पोलीस प्रशासन त्यांना न्याय देईल असं यावेळी नांदगावकर यांनी म्हटलं.

बाळा नांदगावकर म्हणाले, "पंधरा दिवसात अंबरनाथ मध्ये दोन मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणे हल्ले झाले, त्यात एक राकेशचा मृत्यू झाला तर, एक मनोज शेलार हे जखमी झाले. या हल्ला बाबत पत्रकारांनी नांदगावकर यांना विचारले असता ते म्हणाले, "ज्याच्या हाती ससा तो पारधी" या प्रमाणे सत्ता त्यांच्या हातात आहे, त्याच्यामुळे मस्ती चालू आहे, पण एक आहे बदलणारे चित्र आहे ते, याचा अर्थ त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारणार असा प्रकार नसतो, परंतु एक मुलगा जीवानिशी गेलाय, मनोज शेलारवर हल्ला झालाय आणि अस जर नेहमीच झालं तर, वाघ बोललं तरी खाणार आणि वाघ्या बोललं तर खाणार ना आणि आमचं आयुष्य लढाईतच गेलं आहे." बाळासाहेबांनी आम्हाला तसंच उभं केलंय, या पोरांना राज ठाकरे नी उभं केलंय, हे दोन्ही तसेच आहेत, त्याच्यामुळे पाहू पुढे काय करायचे ते,  असा अप्रत्यक्ष इशाराच नांदगावकर यांनी शिवसेनेला दिला.  

अंबरनाथ मधील पाले गावात असलेल्या पटेल आर मार्ट या शॉपिंग मॉल बाहेर उभे असलेले अंबरनाथ शहराचे मनसेचे उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. बुधवारी सांयकाळी हा हल्ला झाला होता. हल्ल्यात जखमी राकेश पाटील यांना रुग्णालयात उपचारार्थ घेऊन गेले असता त्यांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला सहा जणांनी केला असून ते दोन कार मधून आल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. हि हत्या व्यावसायिक वादातून झाल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

आता दोन आरोपींच्या शोध कामी पोलीस लागले आहेत. या घटनेने अंबरनाथ मधील पालेगाव परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी अंबरनाथ मधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या जबरी चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांनी नागरीक अक्षरशः त्रस्त झाले. त्यातच राज्याच्या वेगवेगळ्या भागात खूनाच्या घटना वारंवार घडत आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वी एका राजकीय पदाधिकाऱ्याचा खून झाला. त्यानंतर दोन दिवसापूर्वी एकाच दिवशी घडलेल्या दोन घटनांमुळे शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची वस्तुस्थिती आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख