गोव्यात चित्रीकरणात आमदार सरदेसाईंचा आक्रमक 'सूर'..शुटिंग बंद पाडले.. - mla vijai sardesai president of goa forward party stopped the shooting of sur nava dhyas nava show  | Politics Marathi News - Sarkarnama

गोव्यात चित्रीकरणात आमदार सरदेसाईंचा आक्रमक 'सूर'..शुटिंग बंद पाडले..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 मे 2021

. अनेक निर्मात्यांनी गोव्यात चित्रीकरणास प्रारंभ केला आहे.

मडगाव :  केंद्र सरकारने देशात कोरोनाची तिसरी मोठी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गोव्यात goa गेल्या २४ तासात ७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे गोवा सरकारची चिंता वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारी यंत्रणेने कंबर कसली आहे. लॅाकडाउनमुळे मुंबई व अन्य ठिकाणी होणारे चित्रपटाचे  चित्रीकरण थांबले आहे. अनेक निर्मात्यांनी गोव्यात चित्रीकरणास प्रारंभ केला आहे.  गोव्यातील मडगाव आणि फातोर्डा परिसरात चित्रीकरणामुळंच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. mla vijai sardesai president of goa forward party stopped the shooting of sur nava dhyas nava show 
 

कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत असतानाही गोव्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला नाही, मात्र, निर्बंध आणखी कडक केले आहे.  प्रवाशांची ये-जा आणि अनेक मालिकांचे चित्रीकरण इथं सुरु आहे. एका खाजगी वाहिनीवर सुरू असलेला 'सूर नवा ध्यास नवा' sur nava dhyas nava या रिअॅलिटी शोचे शुटिंग सुरू असताना त्याला राजकीय नेते, आणि स्थानिक नागरिक विरोध करताना दिसत आहेत.

पतीच्या ओैषधासाठी अनवाणी धावून स्पर्धा जिंकणाऱ्या लता करे कारोनाची झुंज हरल्या..पतीचे निधन 

'सूर नवा ध्यास नवा' या रिअॅलिटी शोचे शुटिंग सुरू असताना गोवा फॉरवर्ड पक्षाचे Goa Forward Party आमदार विजय सरदेसाई Vijay Sardesaiयांनी शुटिंग सुरु असताना काल गोंधळ घातला.  चित्रीकरणाला विरोध केला आहे. गोव्याचे रविंद्र भवन येथे चित्रीकरण सुरु होते. याला सरकारनेच परवानगी दिली असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. गायक अवधुत गुप्ते यांनी सरदेसाई यांना समविण्याचा प्रयत्न केला. पण सरदेसाई यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. सरदेसाई यांनी या चित्रीकरणाचा व्हिडिओ टि्वटरवरुन शेअर केला आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख