आमदार सुनिल भुसारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह   - MLA Sunil Bhusar corona test positive | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार सुनिल भुसारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह  

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

विक्रमगड विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल भुसारा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

पालघर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विक्रमगड विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल भुसारा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

त्यासमवेत त्यांच्या वाहन चालकही पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, गेल्या दोन चार दिवसांत त्यांच्या संपर्कातील लोकांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी तसेच क्वारंटाईन राहावे, असे आवाहन भुसारा यांनी केले आहे.

आमदार सुनिल भुसार यांचे या आठवड्यातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
 

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट? बेफिकीरीमुळे संसर्ग वाढला
अनलॉक सुरू झाल्यापासून मुंबईत रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी 2 हजारपेक्षा अधिक रुग्णांची भर पडत असल्याने त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचे स्पष्ट संकेत देत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत असून नागरिकांची बेफिकीरी या परिस्थितीला कारणीभूत असल्याचेही ते सांगतात. मुंबईतील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 82 लाख 77 झाली आहे. रुग्णवाढीचा दर 1.24 आहे; तर मृतांची संख्या 8 हजार 422 झाली आहे. त्यातच "अनलॉक' सुरू झाल्यापासून शहरातील वर्दळ वाढली आहे. त्याचाच परिणाम रुग्णसंख्येवर दिसत आहे. 

हेही वाचा : "फडणवीस मुख्यमंत्री होतील त्या दिवशी नाणारची अधिसूचना निघेल...  

सिंधुदुर्ग  : "राज्यातील महाविकास आघा़डीचं सरकार पडेल, पण नाणार रिफायनरी प्रकल्प नाणारमधून जाणार नाही, भाजपची सत्ता आल्यानंतर नाणारची पुन्हा अधिसुचना निघेल," असे वक्तव्य  भाजपचे माजी आमदार, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केलं आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला भाजपने आता थेट प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे कोकणातील नाणार रिफायन्सी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. राज्यात भाजपची सत्ता येईल. देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी मुख्यमंत्री होतील, त्या दिवशी नाणारची अधिसूचना निघेल, असाही दावा प्रमोद जठार यांनी केला. माजी आमदार प्रमोद जठार यांनी याबाबत व्हिडिओ शेअर करून शिवसेनेला आव्हान दिलं असल्याने आता नाणारवरून शिवसेना-भाजप यांच्यातील वाद पेटण्याची चिन्ह आहेत. या व्हिडिओमध्ये जठार म्हणतात की महाविकास आघा़डी सरकार पडेल, पण कोकणातील (रत्नागिरी) रिफायनरी प्रकल्प नाणारमधून जाणार नाही, भाजपची सत्ता आल्यानंतर नाणारची पुन्हा अधिसूचना निघेल. शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध करून दीड लाख युवकांचे रोजगार हिरावून घेवू नये.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख