लॉकडाउनचे नियम पाळत आमदार क्षीरसागरांकडून कुटुंबियांसोबतच रंगाची उधळण - MLA Sandeep Kshirsagar following the rules of lockdown with his family Rangpanchami celebration | Politics Marathi News - Sarkarnama

लॉकडाउनचे नियम पाळत आमदार क्षीरसागरांकडून कुटुंबियांसोबतच रंगाची उधळण

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

आमदार संदीप क्षीरसागर यांनी लॉकडाउन नियमांचे पालन करत कुटूंबियांसमवेत धुलीवंदन साजरे केले.

बीड : कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आणि लॉकडाउन लागल्याने सार्वजनिक साजऱ्या होणाऱ्या होळी व धुलीवंदन सणावर विरजन पडले. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी लॉकडाउन नियमांचे पालन करत सोमवारी घरीच कुटूंबियांसामवेत रंगाची उधळण करत धुलीवंदन साजरे केले. त्यांचे वडिल रवींद्र क्षीरसागरही मुले आणि नातवांसोबत रंग खेळण्यात दंग झाले आणि रंगात न्हाऊन निघाले. 

जिल्ह्यात होळी आणि धुलीवंदन मोठ्या उत्साहात आणि सावर्जनिक पद्धतीने साजरे केले जातात. सर्व काही विसरुन एकमेकांना रंग लावून आनंद साजरा करण्याचा सण म्हणजे धुलीवंदन. दरवर्षी आमदार संदीप क्षीरसागर तरुण सवंगड्यांसह रंगोत्सव साजरा करतात. त्यांच्या नगर रोडवरील घरी दरवर्षी संदीप क्षीरसागर यांना रंग लावण्यासाठी समर्थकांची गर्दी असते. 

यंदा मात्र, कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्याने जिल्ह्यात दहा दिवसांचे लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर, वडिल रवींद्र क्षीरसागर, आई जिल्हा परिषद सदस्या रेखा क्षीरसागर, भाऊ उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, लहान भाऊ अर्जुन क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या कुंटुबियांनी रंगांची उधळण करत रंगात न्हाऊन गेले. अगदी रवींद्र क्षीरसागर देखील चिमुकल्या नातवांसोबत रंग खेळण्यात दंग झाले आणि रंगात न्हाऊन निघाले.

पीपीटी किट घालून जिल्हाधिकाऱ्यांचा रुग्णांशी संवाद..
बीड : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेले रुग्ण व संसर्गाचे प्रमाण रोखण्यासाठी लॉकडाउन सुरुच आहे. मात्र, रुग्णांना उपचाराची सुविधा आणि रुग्णांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन सुविधांचा आढावा घेतला. पीपीई किट घालून कोव्हिड वार्डात जाऊन रुग्णांशीही संवाद साधला. तत्पुर्वी त्यांनी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन प्लँटचे उद॒घाटनही केले. कोविड वार्डांना भेटीसह जिल्हा रुग्णालयातील विविध विभाग व परिसराचीही त्यांनी पाहणी केली. त्यांच्या समवेत बीडचे तहसिलदार शिरिष वमने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. ढाकणे, समन्वयक डॉ. सचिन आंधळकर, भांडारपाल मुंडे होते. सुविधा व उपचारांबद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केल्याचे रविंद्र जगताप म्हणाले. सध्या उपलब्ध असलेल्या पीपीई किटमुळे लवकरच अंगाला घाम येत असल्याच्या अधिकारी व परिचारिकांच्या तक्रारी योग्य आहेत. आपल्यालाही तसा अनुभव आला असून याबाबत शासनाला कळवून लवकरच नवीन किट मागविण्यात येणार असल्याचेही रविंद्र जगताप म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख