नितीन गडकरींनी आमदार क्षीरसागरांच्या मागणीची घेतली दखल..पत्रही पाठविले - mla Sandeep Kshirsagar demand was accepted by Nitin Gadkari | Politics Marathi News - Sarkarnama

नितीन गडकरींनी आमदार क्षीरसागरांच्या मागणीची घेतली दखल..पत्रही पाठविले

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 मे 2021

नितीन गडकरी यांनी या कामासाठी तीन कोटी ८८ लाख रुपयांचा निधी  मंजूर केला आहे.

बीड : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रस्त्याच्या बांधकामासाठी निधी मिळावा, यासाठी राष्ट्रवादी कॅाग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर Sandeep Kshirsagar यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. बीड - साक्षाळपिंप्री या रस्त्याच्या बांधकामासाठी तीन कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी संदीप क्षीरसागर यांना तसे पत्रही शुक्रवारी पाठविले.  mla Sandeep Kshirsagar demand was accepted by Nitin Gadkari 

बीड शहरातील करपरा नदीपासून खापरपांगरी - पारगाव शिरस - साक्षाळपिंप्री या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय  सीआरआयएफमधून निधी मिळावा, यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निधीची मागणी केली. चार महिन्यांपूर्वी क्षीरसागर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अखेर या मागणीला यश आले आहे. नितीन गडकरी यांनी या कामासाठी तीन कोटी ८८ लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. तसे पत्र त्यांनी शुक्रवारी संदीप क्षीरसागर यांना पाठविले. 

सोनियांचे मोदींना पत्र..म्यूकरमायकोसिसच्या अपुऱ्या ओैषधांबाबत व्यक्त केली चिंता..

निवडणुकीत जायंट किलर ठरलेले संदीप क्षीरसागर यांच्याकडून मतदारांच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा आहेत. अपेक्षांच्या पुर्ततेसाठी आमदार क्षीरसागर देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. तसे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची आमदार क्षीरसागर यांच्यावर खास मर्जी असल्याने राज्यातले मंत्रीही त्यांच्या मागणीबाबत कायम सकारात्मक असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार क्षीरसारांच्या प्रस्तावांना आतापर्यंत तातडीने मंजूऱ्या मिळाल्या आहेत. दरम्यान, बीड शहरातील करपरा नदीपासून खापरपांगरी - पारगाव सिरस - साक्षाळपिंप्री हा रस्ता खराब झालेला आहे. रस्ता दरुस्तीची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. हा विषय केंद्राच्या अखत्यारित असल्याने त्यांनी यासाठी शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून नितीन गडकरींकडे प्रयत्न केले. त्याला यशही मिळाले.

अंबिका चौक ते करपरा नदीपर्यंत सिमेंट रस्ता बांधणी आणि नाली बांधकामासाठी सहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच निविदा प्रक्रियाही पुर्ण होईल, असे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. या रस्ता व नालीचे बांधकाम लवकरच करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख