आमदार कल्याणशेट्टी स्वतः कोरोना रुग्णांना भेटून दररोज करतात चौकशी - MLA Sachin Kalyan Shetty himself visits Corona patients and inquires daily | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

आमदार कल्याणशेट्टी स्वतः कोरोना रुग्णांना भेटून दररोज करतात चौकशी

राजशेखर चौधरी
रविवार, 9 मे 2021

आमदार कल्याणशेट्टी यांच्या पुढाकारातून अक्कलकोट येथे २५ ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली होती. मात्र, कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा ७५ ऑक्सिजन बेडची सुविधा केली जाणार आहे.  

अक्कलकोट : येथे अक्कलकोटचे (Akkalkot) आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyan Shetty) यांच्या पुढाकाराने मागील पंधरवड्यात २५ ऑक्सिजन (Oxygen) बेडची सोय उपलब्ध करण्यात आली होती, पण रुग्ण संख्या आणखी वाढत असल्याने येत्या दोन दिवसात आणखी ७५ ऑक्सिजन बेडची सोय कार्यांवित केली जाणार आहे. त्याची तयारी पूर्ण होत आली असून यामुळे वाढत्या कोरोना रुग्णांची सोय अक्कलकोट येथेच होणार आहे. एकूण १०० ऑक्सिजन बेड आणि त्यातील दहा बायपॅप बेडसुद्धा सुद्धा असणार आहेत. (MLA Sachin Kalyan Shetty himself visits Corona patients and inquires daily)

याचा साधारण एकूण खर्च २० लाख रुपये एवढा येणार आहे. दरवर्षी विवेकानंद परिवाराच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. तो कोरोनामुळे (Corona) होऊ शकला नाही यामुळे त्यातून वाचलेला खर्च हा कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी वापरला जात आहे. ज्यावेळी रुण हा थोडा अस्वस्थ होतो. त्यावेळी त्याला ऑक्सिजनची गरज भासते आणि थोडा आणखी अस्वस्थ झाला तर त्याला बायपॅप बेडची गरज भासते. या दोन्हीची सोय या ठिकाणी झाल्याने विधानसभा क्षेत्रातील रुग्णांची चांगली सोय होणार आहे.

हे ही वाचा : जयंत पाटलांनी शब्द पाळला ; मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण सुरु

अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ रुग्णालय या खासगी ठिकाणी शासकीय डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर अतिशय चांगल्या सुविधेने कार्यांवित होऊन चांगल्या दर्जाची सोय इथे असलेल्या डॉक्टर व इतर स्टाफकडून पूर्वण्यात येत असल्याने कोरोना रुग्णांना चांगला दिलासा मिळाला आहे. या सर्व कामात तहसीलदार अंजली मरोड, तालुका आरोग्य अधिकरा व कर्मचारी, शासनाचे सर्व विभागाचे पुरेसे समन्वय आणि नियोजन आदी बाबीही महत्वाच्या ठरत आहेत.

अक्कलकोट येथे पंधरा दिवसात कार्यान्वित होणार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प 

अक्कलकोट येथील या डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेन्टर मध्ये कल्याणशेट्टी यांनी सतत लक्ष घालून पाठपुरावा केल्याने येत्या पंधरा दिवसात हवेतून ऑक्सिजन शोषून घेऊन ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प येत्या पंधरा दिवसात कार्यान्वित होणार आहे. यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च येणार असून त्यासाठी आमदार निधी २५ लाख तर २५ लाख रुपये हे राज्याच्या आपत्कालीन फंडातून मिळणार आहे. सदर प्रकल्प मार्गी लागल्याने दररोज ६० सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती येथेच होऊन संपूर्ण ऑक्सिजनची गरज भागणार आहे.

हे ही वाचा : अशी परतवणार नाशिकमध्ये कोरोनाची तिसरी लाट!

कल्याणशेट्टी यांनी जेव्हापासून 25 ऑक्सिजन बेडची सोय अक्कलकोट येथे केली तेंव्हापासून ते दररोज एक तास सर्व कोरोना रुग्णांची स्वतः फिरून भेट घेतात. त्यांची चौकशी करून त्यांना धीर व दिलासा देण्याचे काम न चुकता करीत आहेत. याशिवाय रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर पथक यांचीही भेट घेऊन चर्चा करून आलेल्या समस्या मार्गी लावण्याचे काम करीत आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख