"हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणारा लोकनेता.."रोहित पवारांची पोस्ट व्हायरल.. - MLA Rohit Pawar post viral Sharad Pawar at Breach Candy Hospital | Politics Marathi News - Sarkarnama

"हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणारा लोकनेता.."रोहित पवारांची पोस्ट व्हायरल..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 मार्च 2021

आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर काल मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. आज त्यांची प्रकृती उत्तम आहे. आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, "ब्रीच कँडी' हॉस्पिटलमध्ये आदरणीय Sharad Pawar  साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले. सर्वांनाच काळजी वाटत असली तरी साहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांना लवकर आराम मिळेल. शस्त्रक्रिया करणारे डॉ. मायदेव आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार! शस्त्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री Rajesh Tope  साहेबांसह आम्ही पवार साहेबांची भेट घेतली. टोपे साहेबांना पाहून पवार साहेबांनी त्यांच्याकडून इतर विषयांसह राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेतली. हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो!"   

आज शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. आज सकाळी वृत्तपत्रांचे वाचन करतानाचा फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केला असून पवार अत्यंत प्रसन्न मुद्रेत असल्याचे या फोटोवरुन जाणवत आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. नारायण राणे हे पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. राजकारणात वैचारिक भूमिका वेगळ्या असल्या तरी व्यक्तीगत मैत्री जपताना नेते दिसतात, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये शरद पवार यांच्यासोबत नारायण राणे होते. 

काल रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचेही छायाचित्र सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केले होते. पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

 Edited  by :  Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख