आमदार रवी राणांची दिवाळी तुरुंगातच... फडणवीस भडकले.. - MLA Ravi Rana to spend diwail in Jail | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार रवी राणांची दिवाळी तुरुंगातच... फडणवीस भडकले..

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

नवनीत राणा यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले...

तिवसा (जि. अमरावी) : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत व वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी आमदार रवी राणा यांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले होते. यामुळे त्यांच्यासह १६ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाने काल रात्री उशिरा आमदार रवी राणा यांच्यासह १६ कार्यकर्त्यांना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी तुुरुंगातच जाणार आहे. या घटनेचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. तसेच सरकारची ही दडपशाही असल्याची टीका केली आहे. 

 

अतिरिक्त विजबिलमुळे सर्व सामान्य जनता हैराण झाली आहे. यातच अतिवृष्टी पावसामुळे सोयाबीन , व कपाशीवर बोन्डआळीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला त्यामुळे सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजार मदत व वीजबिल माफी करावी यासाठी आमदार रवी यांनी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन अमरावतीच्या गुरूकुंज मोझरी येथे रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे पोलीसांनी आंदोलन स्थळावरून आमदारासह १६ कार्यकर्त्यांना अटक करत गुन्हे दाखल केले. त्यानंतर रात्री उशीरा आमदार रवी राणा सह त्यांच्या शेतकऱ्यांवर तिवसा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यानंतर रात्री ११-३० च्या सुमारास तिवसा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.त्यानंतर न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

काल मध्यरात्री रवी राणा व शेतकऱ्यांना अमरावती कारागृहाच्या विलगिकरन कक्षात ठेवले असता आज दुपारी 12 जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा व कार्यकर्ते भेटण्यासाठी गेले असता पोलीसांनी त्यांना रोखले त्यामुळे खासदार व कार्यकर्ते यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत प्रशासन व सरकारच निषेध केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख