रणजितसिंह मोहिते पाटील मुंबईतून शपथ घेऊन अकलूजला आले आणि....

रेड व ऑरेंज झोनमधून प्रवास व वास्तव्य करून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करावे, असा अध्यादेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी काढल्याने त्या आदेशाचे तंतोतंत पालन करत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील सपत्नीक होम क्वारंटाइन झाले आहेत.
ranjitsinh
ranjitsinh

अकलूज : मुंबईहून विधान परिषद आमदारकीची शपथ घेऊन अकलूजला परतलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले आहे.

विधान परिषदेवर बिनविरोध निवड झालेल्या आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा सोमवारी मुंबईत आमदारकीचा शपथविधी पार पडला. शपथविधी उरकून आमदार मोहिते-पाटील रात्री आपल्या गावी अकलूज येथे परतले. रेड व ऑरेंज झोनमधून प्रवास करून आल्याने आमदार मोहिते-पाटील यांनी मंगळवारी (ता. 19) अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, स्विय सहायक बापू शितोळे, चालक किसन कदम व मधुकर घोगरे हेही शपथविधीच्या कार्यक्रमास मुंबई येथे गेले होते. या सर्वांनीही आपापली तपासणी करून तेही होम क्वारंटाइन झाले आहेत.

रेड व ऑरेंज झोनमधून प्रवास व वास्तव्य करून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करावे, असा अध्यादेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी काढल्याने त्या आदेशाचे तंतोतंत पालन करत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील सपत्नीक होम क्वारंटाइन झाले आहेत.

कोरोना वाढ शोधासाठी सिरो-सर्व्हे

सोलापूर : देशातील कोविड 19 या विषाणूच्या प्रसाराची व्याप्ती समजण्यासाठी 21 राज्यांमधील 69 जिल्ह्यांमध्ये सिरो-सर्व्हे केला जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील बीड, नगर, जळगाव, परभणी, नांदेड, सांगली जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यातील रुग्ण संख्येने आता 35 हजारांचा टप्पा अल्पावधीतच ओलांडला आहे. एक मेच्या तुलनेत 18 मेपर्यंत राज्यात 23 हजार 552 रुग्ण वाढले आहेत. मागील 18 दिवसांपासून सरासरी सात ते आठ हजार संशयित व्यक्तींची कोरोना टेस्ट केली जात असून त्यासाठी दररोज तब्बल तीन कोटी 23 लाख रुपयांचा खर्च होत आहे. तर दुसरीकडे राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही आत्तापर्यंत कोरोना टेस्टसाठी राज्य सरकारला 127 कोटी रुपयांचा खर्च करावा लागला आहे. तत्पूर्वी, केंद्र सरकारच्या माध्यमातून कोरोना या विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी प्रतिबंधित परिसरांमध्ये 'क्‍लस्टर कंटेनमेंट कृती योजना' राबविली जात आहे.

तरीही खर्च कमी झाला नसून आता हा खर्च कमी करणे आणि राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने केंद्र सरकारने देशातील 69 जिल्ह्यांमध्ये सिरो-सर्व्हे करण्याचे नियोजन केले आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या 'इलायझा' या पद्धतीचा वापर करून संबंधित समूहातील व्यक्तीच्या रक्त नमुन्याची चाचणी घेतली जाणार आहे. प्राप्त माहितीवर संशोधन करून कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष नियोजन केले जाणार आहे.

असे होणार सर्व्हेक्षण


या सर्व्हेअंतर्गत या जिल्ह्यांमधील रॅन्डम पद्धतीने दहा समूहांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक समूहातील 40 जणांची (एकूण 400) रक्ततपासणी केली जाणार आहे. या तपासणीद्वारे त्या व्यक्तीच्या रक्त द्रवातील प्रतिपिंडाचा (एन्टीबॉडी) शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय रोग निवारण केंद्र (नवी दिल्ली), राष्ट्रीय साथरोग शास्त्र संस्था (चेन्नई) व राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्र (चेन्नई) यांची मदत घेतली जाणार आहे.

रुग्ण कमी असलेल्या ठिकाणी सर्व्हे कशासाठी?

राज्यातील रुग्ण संख्या दररोज दीड ते दोन हजाराच्या पटीत दररोज वाढू लागली आहे. आता पावसाळा सुरू होणार असल्याने या विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर हा सर्व्हे काही दिवसात पूर्ण केला जाणार आहे. काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार, मालेगाव, पुणे, सोलापूर, नागपूर, अकोला व औरंगाबाद या शहर- जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या प्रसाराची व्याप्ती या शहर जिल्ह्यातूनच शोधण्याची गरज आहे. मात्र, केंद्र सरकारने बीड जिल्ह्यात तीन, नगर जिल्ह्यात 84, जळगावमध्ये 292, परभणीत सात, नांदेडमध्ये 78 आणि सांगलीमध्ये 53 रुग्ण सापडले असतानाही या जिल्ह्यांची सर्व्हेसाठी निवड झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com