बार्शीमध्ये नव्या युतीचे संकेत...राऊतांच्या विरोधात मोर्चेबांधणी... - MLA Rajendra Mirgane campaign against BJP MLA Rajendra Raut | Politics Marathi News - Sarkarnama

बार्शीमध्ये नव्या युतीचे संकेत...राऊतांच्या विरोधात मोर्चेबांधणी...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनी भाजपचे आमदार  राजेंद्र राऊत यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे.

बार्शी : बार्शी मतदार संघ सर्वच राजकीय पक्षासाठी महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. बार्शी नगरपालिकेत आमदार राजेंद्र राऊत यांची सत्ता आहे. बार्शी नगरपालिकेत भुयारी गटार योजना रस्ता, पाणीपुरवठा असे विविध गैरव्यवहारांमुळे सध्या बार्शी नगरपालिका गाजत आहेत.

त्यामुळे भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनी भाजपचे आमदार असलेले राजेंद्र राऊत यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे, बार्शी नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे प्रकरणे सातत्याने समोर आणताना दिसून येत आहेत. बार्शी नगरपालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणात सातत्याने समोर येत आल्याने आमदार राजेंद्र राऊत यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण होत आहे. नगरपालिकेत दिलेली आश्वासनं आमदार राऊत यांनी पाळलेले दिसून येत नाहीत. 

आगामी नगरपालिका निवडणुकीत आमदार राऊत यांच्या विरोधात पुन्हा एकदा एकवटलेले दिसून येत आहेत. सोपल-मिरगणे-आंधळकर हे त्रिकूट एकत्र झाले आहे. 

आगामी काळासाठी सोपल, मिरगणे, आंधळकर एकत्र झाल्याने बार्शी नगरपालिकेमध्ये राजेंद्र राऊत यांना धक्का बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काळामध्ये हे त्रिकुट आमदार राऊत यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे. 

बार्शी नगरपालिकेतील मोर्चेबांधणी करताना दिलीप सोपल, राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर एकत्र आल्याने आगामी काळासाठी आमदार राजेंद्र राऊत यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. बार्शी नगरपालिकेत परिवर्तन करण्यासाठी भाजपचे नेते राजेंद्र मिरगणे, शिवसेनेचे नेते दिलीप सोपल, भाऊसाहेब आंधळकर यांनी शिवसेना नवीन आघाडी केल्याने आगामी काळात राजकीय काय परिणाम होते पाहणं औचित्याचे ठरेल. 

हेही वाचा : शेतकऱ्यांचं संपूर्ण पीककर्ज माफ करा : सदाभाऊ खोत  
 
सांगली : "शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे. आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण पीककर्ज माफ करावे, " अशी मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
इस्लामपूर (सांगली) येथे सदाभाऊ खोत बोलत होते. सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई सरकारने द्यावी. फळ बागाला 50 हजार आणि कोरडवाहू पिकाला 25 हजार तातडीने मदत करावी, असेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख