नितीन राऊत, तुम्ही राजीनामा कधी देणार?..पडळकरांचा सवाल..(व्हिडिओ पाहा) - MLA Gopichand Padalkar will criticize Thackeray government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

नितीन राऊत, तुम्ही राजीनामा कधी देणार?..पडळकरांचा सवाल..(व्हिडिओ पाहा)

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 जून 2021

काँग्रेसचे मंत्री काका-पुतण्याच्या समोर माना डुलवत आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात  भाजपने रान उठवण्यात सुरवात केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची आज पंढरपुरात विविध समाजातील  प्रमुखासोबत घोंगडी बैठकांचे आयोजन केलं आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. MLA Gopichand Padalkar will criticize Thackeray government

पडळकर म्हणाले,  "बहुजन समाज भाजपसोबत आहेत. विविध समाजाला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारकडे नाही. मागासवर्गीयाचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. सेवाज्येष्ठतेनुसार आरक्षण देण्याचे ठरलं आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका लोकांना समजली आहे. सरकारने मराठा आरक्षणाचा गायकवाड आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीने मांडता आला नाही. हे सरकार आरक्षणाच्या विरोधात आहे. ओबीसींची राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं आहे. ओबींसीचा डाटा सुप्रीम कोर्टात सादर केला नाही. पदोन्नतीमध्ये ७ मे चा जीआर रद्द करा, ही आमची आहे, या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ठेंगा दाखविला. आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे. "  

"नितीन राऊतांसारखा मागासवर्गीयांचा नेता आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होत ती ७ मे चा जीआर रद्द केला नाही तर मी राजीनामा देईल, मी राऊतांना आवाहन करतो आता तुम्ही राजीनामा देणार आहात का, काँग्रेसचे मंत्री काका-पुतण्याच्या समोर माना डुलवत आहे, त्यांच काहीही चालत नाही. सोनिया गांधी यांनी मागासवर्गाचा सुविधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यांना सुद्धा त्यांनी दाद दिली नाही, सत्तेसाठी हे लोक लाचार झाले आहेत," असे पडळकर यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच भाजपने अधिक लक्ष  देण्यास सुरवात केली आहे. ही जबाबदारी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर सोपवली आहे. आमदार पडळकर  आज  पंढरपुरातील प्रमुख दहा विविध  समाजातील लोकांशी संवाद साधणार आहेत. आमदार पडळकर संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन या नव्या मोहिमेची सुरवात करणार आहेत. दिवसभर विविध मठांमध्ये जावून  घोंगडी बैठकांच्या माध्यमातून विविध जातीच्या आणि धर्माच्या लोकांशी संवाद साधणार आहेत. या दरम्यान गेल्या दोन वर्षातील  महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा मांडणार आहेत. "साद बहुजनांच्या हक्कासाठी.." या  अभिमानाची आज पंढरपुरातून सुरवात केली आहे. 
Edited by : Mangesh Mahale 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख