आमदार पडळकर आघाडी सरकारला जाब विचारणार.. - MLA Gopichand Padalkar will criticize Thackeray government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

आमदार पडळकर आघाडी सरकारला जाब विचारणार..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 जून 2021

"साद बहुजनांच्या हक्कासाठी.." मोहीमेची आज पंढरपुरातून सुरवात होणार आहे.

पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात आता पासून भाजपने रान उठवण्यात सुरवात केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची आज पंढरपुरात विविध समाजातील  प्रमुखासोबत घोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील  राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच भाजपने अधिक लक्ष  देण्यास सुरवात केली आहे. ही जबाबदारी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर सोपवली आहे. आमदार पडळकर  आज  पंढरपुरातील प्रमुख दहा विविध  समाजातील  लोकांशी संवाद साधणार आहेत.  

आमदार पडळकर संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन या नव्या मोहिमेची सुरवात करणार आहेत. दिवसभर विविध मठांमध्ये जावून  घोंगडी बैठकांच्या माध्यमातून विविध जातीच्या आणि धर्माच्या लोकांशी संवाद साधणार आहेत. या दरम्यान  गेल्या दोन वर्षातील  महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा मांडणार आहेत. "साद बहुजनांच्या हक्कासाठी.." या  मोहीमेची आज पंढरपुरातून सुरवात होणार आहे.

आमदार मोहितेंच्या मागणीला गृहमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद 
 
मंचर : आंबेगाव तालुक्यातील सर्व कामे मार्गी लावणे माझी जबाबदारी आहे, पण दिलीपराव माझा जन्म खेडचा आहे, खेड तालुक्याशी माझी बांधिलकी आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. खेड तालुक्यालाही विकास कामांसाठी काही कमी पडू देणार नाही, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्याकडे कटाक्ष टाकत सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शिवनेरी जम्बो कोविड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात बऱ्याच कालावधीनंतर खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांनी आंबेगाव तालुक्यातील वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे मोहिते काय बोलणार याविषयी उपस्थितांमध्ये उत्सुकता होती. खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी मंत्री वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील कोरोना उपाययोजनांबाबत कामाचे कौतुक करताना "तुम्ही फक्त आंबेगाव तालुक्याचे नाही तर राज्याचे ग्रहमंत्रीआहात. आंबेगाव तालुक्याप्रमाणे जरा खेड तालुक्यावरही विकास कामांसाठी लक्ष द्या अशी कोटी केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख