सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलाल तर घर ही तोडू...   - MLA Ashish Shelar criticizes Mahavikas Aghadi government | Politics Marathi News - Sarkarnama

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलाल तर घर ही तोडू...  

महेश जगताप 
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. आमच्या सोबत राहिलात तर कारवाई नाही आणि सोबत नसाल तर कारवाई असा हा कारभार आहे.

पुणे : अभिनेत्री कंगनाच्या ऑफिसवरच्या कारवाईवरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. शेलार यांनी म्हटलं की, 'बात “हरामखोरीची”निघाली तर मग "डांबराने" लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल ! कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. आमच्या सोबत राहिलात तर कारवाई नाही आणि सोबत नसाल तर कारवाई असा हा कारभार आहे.'

आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना १०६  हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना ?  मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय?  बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा! मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का ? पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरात आणि कंगना रानावतच्या घरात नगरपालिका अधिकारी घुसवलेत ना ?

भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना ? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना ? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशाविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना? कर्तबगार मुंबई पोलिसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला "बिर्याणी" घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची "बिर्याणी" खाताय ना ?  याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना ? बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना?

संबंधित लेख