मोठी बातमी : कोरोनाला हरविण्यासाठी आता लष्कर सज्ज...संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा तीनही दलांना आदेश - ministry of defense responds to the challenge of covid | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : कोरोनाला हरविण्यासाठी आता लष्कर सज्ज...संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा तीनही दलांना आदेश

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 मे 2021

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आता लष्कराचे जवान मैदानात उतरत आहेत.

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आता लष्कराचे जवान मैदानात उतरत आहेत. "प्रशासन आणि नागरिकांना मदत करण्यासाठी सज्ज राहा," असा आदेश संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करांच्या तीनही दलांना दिला आहे.ministry of defense responds to the challenge of covid

ज्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या राज्यात लष्कराच्या रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेडची व्यवस्था करण्यात येत आहे.  देशभरात ४ हजार बेड आणि ५८५ आयसीई बेड हे कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. दिल्लीतील लष्करी रुग्णालयात कोविड रुग्णालयात करण्यात आले आहे. त्यांची क्षमता ४०० बेडवरुन १ हजार बेड करण्यात आली आहे. दिल्ली, लखनैा, अहमदबाद येथील लष्करी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. 

ममतादीदींची निवडणूक आयोगाला चपराक..सत्ता पुन्हा हाती येताच IAS,IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या.. 

आँक्सिजनच्या वितरणासाठी हवाईदलाकडून विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. आतापर्यत ४५२७ मेट्रीक टनचे २३० आँक्सिजन कंटेनरचे विमानांनी वितरण करण्यात आले आहे.  कोरोनाच्या उपाययोजनाबाबत संरक्षण मंत्रालय राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करीत आहेत. 

 
हेही वाचा : न्यायालयातूनच लावला फोन अन् अर्ध्या तासात वादग्रस्त जिल्हाधिकाऱ्यांची बदली
  
अगरतळा : लग्न समारंभावर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह छापा टाकला होता. त्यांनी वधू-वरासह वऱ्हाडींना अपमानित करून मंडपाबाहेर काढले. काहींना लाठ्याही खाव्या लागल्या. याप्रकरणी राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करून पदावरून हटवले. पण हे प्रकरण आता न्यायालयात गेले आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे बहुतेक सर्वच राज्यांमध्ये लग्न समारंभांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. उपस्थितांच्या संख्येसह मास्कचा वापर करण्याबाबत नियम करण्यात आले आहेत. त्याचे पालन केल्यास कारवाई केली जात आहे. पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी काही दिवसांपूर्वी एका लग्नसमारंभात छापा टाकला होता. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटाही होता. या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख