राज्यातील पाच मंत्री कोरोना पाॅझिटिव्ह : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लागण

एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनीआपली प्रकृती सध्या ठीक असल्याचेसांगितलेआहे. तसेच संपर्कात आलेल्यांना योग्य काळजी घेण्याचे आणि कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.
eknath shinde ff.jpg
eknath shinde ff.jpg

मुंबई : राज्यातील मंत्री कोरोनामुळे बाधित होणाऱ्यांच संक्या रोज वाढच असून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्याची लागण झाली आहे. कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचीही कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली होती. गेल्या पाच दिवसांत ऊर्जामंत्री नितीन राऊत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.  त्यांनी आपली प्रकृती सध्या ठीक असल्याचे सांगितले आहे. तसेच संपर्कात आलेल्यांना योग्य काळजी घेण्याचे आणि कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती”.

राज्यात बुधवारी दिवसभरात २१ हजार २९ करोना रुग्णांची नोंद झाली. तर दुसरीकडे १९ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. यासोबत राज्यभरात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ५६ हजार ३० वर पोहोचली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.६५ टक्के इतके झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ७३ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com