लस टोचूनही दुसऱ्यांदा मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण   - Minister Dhananjay Munde  Corona Positive for the second time despite being vaccinated | Politics Marathi News - Sarkarnama

लस टोचूनही दुसऱ्यांदा मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण  

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 मार्च 2021

धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे 11 दिवसांपूर्वी म्हणजे 12 मार्चला त्यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला होता. धनंजय मुंडे यांनी खुद्द आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर बॉंम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

धनंजय मुंडे यांना जून 2020 मध्ये पहिल्यांदा कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. मुंडे यांच्यासह त्यांच्या काही स्विय सहायकांना हा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी त्यावेळी अनेक समर्थकांनी देवाला साकडे घातले होते. दरम्यान, 24 जून 2020 ला धनंजय मुंडे उपचारानंतर बरे होऊन रुग्णालयातून बाहेर आले. दरम्यान, सध्या त्यांचे नियमित कामे सुरू होते. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी परळीत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही दिवस मुंडे जिल्ह्यातच होते. शनिवारी मुंडे जिल्ह्याबाहेर गेले. त्यांनी मंगळवारी चाचणी करून घेतल्यानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्यावर बॉंम्बे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

काही दिवसापूर्वी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची कारोना चाचणी पाँझिटिव्ह आली आहे. 'आपल्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी,' असे आवाहन त्यांनी केले आहे. "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व आपली कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती," असे टि्वट गुलाबराव पाटील यांनी केले आहे. माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले होते. महाजन यांनी टि्वट करीत पुढील उपचारासाठी मुंबईला जाणार होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख