माजी खासदाराच्या एका टि्वटमुळे काँग्रेसच्या चिंतेत वाढ. . - Milind Deora tweet puts Congress in trouble | Politics Marathi News - Sarkarnama

माजी खासदाराच्या एका टि्वटमुळे काँग्रेसच्या चिंतेत वाढ. .

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी त्यांचा एक वर्षाचा मालमत्ता कर आणि वीज बिल माफ केले आहे.

मुंबई :  माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या एका माजी खासदारांनी गुजरात सरकारचे कौतुक करणारे टि्वट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानिमित्ताने कॅाग्रेसवर नाराज असलेले हे खासदार पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी गुजरात सरकारने कैातुक केल्यानं कॅाग्रेसची चिंता वाढली आहे. Milind Deora tweet puts Congress in trouble

काल दुपारी जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही वेळातच कॅाग्रेसचे मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा Milind Deoraयांनी टि्वट केलं आहे. देवरा आपल्या टि्वटमध्ये म्हणतात,  "इतर राज्यांनी अनुकरण करावं असं गुजरात सरकारचं हे एक स्वागतार्ह पाऊल आहे." याबाबतची बातमीही त्यांनी टि्वट केली आहे. 

"कोरोनाच्या संकटामुळे गजरातमध्ये हॉटेल उद्योग, रेस्टॉरंट, रिसॉर्ट आणि वॉटर पार्क बंद आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान पाहता मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी त्यांचा एक वर्षाचा मालमत्ता कर आणि वीज बिल माफ केले आहे. देशातील पर्यटन क्षेत्रातील नोकऱ्यांचे आणखी नुकसान रोखण्यासाठी सर्व राज्यांनी तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे."

PNB SCAM : मेहुल चोकसीला डोमिनिका सरकारकडून झटका. 

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोकसी याला डोमिनिका सरकारने मोठा झटका दिला आहे. त्याला अवैध प्रवासी म्हणून घोषित केले आहे. एटिगुआ येथे राहणारा मेहुल चोकशी हा २३ मे रोजी डोमिनिका येथे पोहचला होता. तेव्हा डोमिनिका पोलिसांनी त्याला अटक केली होती. सध्या तो डोमिनिकाच्या कारागृहात आहे. मेहुल चोकशीच्या याचिकेवर सध्या डोमिनिकाच्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. डोमिनिका प्रशासनाने त्यांची याचिका रद्द करण्यासाठी न्यायालयात दस्ताऐवज दाखल केले आहे. त्याला भारतात पाठवावे, असे डोमिनिका प्रशासनाने न्यायालयात सांगितले. डोमिनिका सरकारने त्याला अवैध प्रवाशी म्हणून घोषित केल्याने त्याचे भारतात प्रत्यार्पण होणे शक्य असल्याचे समजते. एटिगुआचे पंतप्रधान गैस्टन ब्राऊन यांनी सांगितले की, मेहुल चोकसीलाआमच्याकडे पुन्हा न पाठविता त्याला भारताकडे सोपवा. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख