कॅाग्रेसने आपले जुने स्थान पुन्हा मिळवावे..मिलिंद देवरांचा सल्ला.. - Milind Deora tweet advises Congress | Politics Marathi News - Sarkarnama

कॅाग्रेसने आपले जुने स्थान पुन्हा मिळवावे..मिलिंद देवरांचा सल्ला..

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जून 2021

मिलिंद देवरा यांनी कॅाग्रेसला सल्ला देणारे टि्वट लक्ष वेधून घेत आहे. 

मुंबई : ज्योतिरादित्य सिंधिया, मिलिंद देवरा, जितिन प्रसाद आणि सचिन पायलट हे कॉंग्रेसच्या युवा ब्रिगेडचे दिग्गज नेते मानले जात होते. यापैकी सर्वात आधी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सचिन पायलट यांनीही बंड केलं होते. काल जितिन प्रसाद यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्याच्या कॅाग्रेसच्या परिस्थितीवर भाष्य करणारे टि्वट माजी खासदार मिलिंद देवरा Milind Deora यांनी केले आहे. त्यांची कॅाग्रेसला सल्ला दिला आहे. Milind Deora tweet advises Congress

कॅाग्रेसमध्ये सुधारणांची मागणी अनेकदा सचिन पायलट आणि मिलिंद देवरा यांनी केली आहे, त्यामुळे ते पायलट आणि देवरा हे दोन्ही नेते चर्चेचा विषय ठरले. जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर मिलिंद देवरा यांनी कॅाग्रेसला सल्ला देणारे टि्वट लक्ष वेधून घेत आहे. 

 
आपल्या टि्वटमध्ये मिलिंद देवरा म्हणतात की,  ‘माझा विश्वास आहे की कॉंग्रेसने आपले जुने स्थान पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कॉंग्रेस हा देशातील एक मोठा पक्ष आहे आणि त्या दृष्टीने तेही हे काम पुन्हा करू शकतात आणि ते त्यांनी केलेही पाहिजे. आपल्याकडे अजूनही असे नेते आहेत ज्यांना ताकद दिली गेली आणि त्यांचा उत्तम प्रकारे उपयोग केल्यास ते चांगला निकाल देऊ शकतात.’ 

काल दुपारी जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही वेळातच कॅाग्रेसचे मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा Milind Deoraयांनी टि्वट केलं आहे. देवरा आपल्या टि्वटमध्ये म्हणतात,  "इतर राज्यांनी अनुकरण करावं असं गुजरात सरकारचं हे एक स्वागतार्ह पाऊल आहे." याबाबतची बातमीही त्यांनी टि्वट केली आहे. 

"कोरोनाच्या संकटामुळे गजरातमध्ये हॉटेल उद्योग, रेस्टॉरंट, रिसॉर्ट आणि वॉटर पार्क बंद आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान पाहता मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी त्यांचा एक वर्षाचा मालमत्ता कर आणि वीज बिल माफ केले आहे. देशातील पर्यटन क्षेत्रातील नोकऱ्यांचे आणखी नुकसान रोखण्यासाठी सर्व राज्यांनी तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे."
 
मंचावर न बसता रस्त्यावरच बसून सुप्रिया सुळेंनी साजरा केला वर्धापन दिन..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वर्धापन दिन आहे. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात ध्वजारोहन करत हा वर्धापन साजरा करण्यात आला. या सोहळ्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेते हजर होते. मात्र, कोरोना महामारीच्या नियमांमुळे पक्ष कार्यालयातील सभागृहात केवळ २५ मान्यवरांना बसण्याची  अनुमती देण्यात आली. मंचावर देखील निवडक नेते बसले होते. मात्र, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर बसावे लागले होते. पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्या असलेल्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनींही मग मंचावर किंवा सभागृहात न बसता बाहेर जाऊन कार्यकर्त्यांसोबत बसण्याचा निर्णय घेतला.  
 Edited by : Mangesh Mahale 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख