महाविकास आघाडीत वाद..गृहनिर्माण मंत्र्यांशिवाय शिवसेनेच्या मंत्र्यांनी लावली बैठक - MHADA Possibility of dispute in Mahavikas Aghadi government Uday Samant Jitendra Awhad | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडीत वाद..गृहनिर्माण मंत्र्यांशिवाय शिवसेनेच्या मंत्र्यांनी लावली बैठक

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील म्हाडा अंतर्गत प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. गृहनिर्माण विभागाची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे. त्यांच्याशिवाय ही बैठक बोलविली असल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आयोजित केलेल्या या बैठकीला मुंबई आणि कोकण विभागातील म्हाडा अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीवरून आता महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. यावर अद्याप जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. 

हेही वाचा : निवडणुकीचा काळ; आधी मार्गशीर्ष पाळला, आता 'बर्ड फ्लू'चे सावट
दाभोळ : दापोलीत बर्ड फ्लूच्या शिरकावामुळे ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत कार्यकर्त्यांबरोबरच खवय्यांमध्ये नाराजी पसरली आहे. चिकनवर ताव मारण्याचे दिवस असताना नवे संकट आल्याने कोंबडी मटणाचा आस्वाद बिनधास्तपणे घेता येणार नाही, हा नाराजीचा मोठा मुद्दा आहे. खाण्याच्या पर्वणीच्या काळात ही संक्रात आल्याने घास तोंडात अडकतोय, अशी स्थिती आहे.

१५ डिसेंबर २०२० रोजी मार्गशीर्ष महिना सुरू झाला होता, तो गुरुवार (ता. १४ जानेवारी) पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यानच्या काळात अनेक खवय्यांनी आपल्या जिभेवर संयम ठेवून गेले महिनाभर मांसाहार टाळला होता. मार्गशीर्ष कधी संपतो आणि चिकनवर कधी ताव मारतो, असे अनेकांना झाले होते. याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार ऐन जोमात सुरू आहे. कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी काहीजणांनी निवडणूक काळात व मार्गशीर्ष संपल्यानंतर मांसाहाराचा बेत आखला होता; मात्र या सर्व बाबींवर बर्ड फ्लूच्या दापोलीतील शिरकावामुळे सर्वांच्याच उत्साहावर पाणी फेरले गेले असल्याचे दिसून आले. एकीकडे कोरोनामुळे हवालदिल झालेले कोंबडी विक्रेते आता बर्ड फ्लूच्या संकटात अडकले आहेत. सामिष भोजनाची व्यवस्था करणाऱ्यांच्या मात्र ही परिस्थिती पथ्यावर पडली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख