`राष्ट्रवादीचे विलीनीकरण करून शरद पवारांना काॅंग्रेसचे अध्यक्ष करा`

आठवलेंच्या सूचनेलाकसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे !
ramdas athvale-pawar.jpg
ramdas athvale-pawar.jpg

पुणे : विविध राजकीय विषयांवर आपली मते स्पष्टपणे मांडणारे केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेससाठी एक सचूना केली आहे. ``काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला  सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे.याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा, अशी सूचना करून आठवले यांनी खळबळ उडवून दिली आहे.

आठवले यांनी पवार यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यावे, असेही आमंत्रण लोकसभा निवडणुकीआधी दिले होते. त्यावर पवार यांनी आठवले यांच्या सर्वच सूचना मनावर घ्यायच्या नसतात, असा टोला मारला होता. त्यानंतर आता थेट पवारांनाच काॅंग्रेसचे अध्यक्षपद देण्याची सूचना करून आठवलेंनी न मागता सल्ला देऊन टाकला आहे.

शरद पवार यांनी 1999 मध्ये काॅंग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने 2004, 2009 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या. सत्ताही एकत्र उपभोगली. मात्र 1999 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकांत दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे होते.  आता आठवले यांच्या या सूचनेवर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आठवले हे गेले काही दिवस आपली मते मोकळेपणाने मांडत आहेत. कंगनाला पाठिंबा द्यायचा विषय असो की सुशांतसिहं प्रकरणात भाजपची बाजू घेण्याचा मुद्दा असो तेथे ते स्पष्टपणे विचार मांडतात.

काॅंग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाला आक्रमक, कार्यक्षम अध्यक्ष नेमण्याचे पत्र सोनिया गांधींना लिहिले होते. ते पत्र लिहिणाऱ्यांना राहुल गांधी यांच्या समर्थकांना भाजपचे हस्तक म्हणून हिणवले होते. अशा हिणवल्य जाणाऱ्या नेत्यांना आठवले यांनी थेट काॅंग्रेसचा त्याग करण्याचा सल्ला दिला होता. ``भाजपचे हस्तक म्हणून अपमानित केलेल्या काँग्रेस च्या नेत्यांनी अपमान सहन करीत न राहता काँग्रेसचा त्याग करावा. देशाच्या विकासासाठी गुलाम नबी आझाद ; कपिल सिब्बल;सारख्या काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप ; आरपीआय आणि एनडीएमध्ये यावे, असे निमंत्रण दिले होते.

त्यांनी विविध विषयांवर मांडलेली मते पुढीलप्रमाणे :

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com