भाजप-शिवसेनेचं टि्वटवार रंगले..शिवसेना नव्हे 'शवसेना' ..अमृतांचा उल्लेख "मृता" - Mentioning Shiv Sena as Shavasena Amrita tweeted and criticized Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप-शिवसेनेचं टि्वटवार रंगले..शिवसेना नव्हे 'शवसेना' ..अमृतांचा उल्लेख "मृता"

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवनेना यांच्यात टि्वटवार रंगले आहे

पुणे : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवनेना यांच्यात टि्वटवार रंगले आहे. काल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक आणि ठाकरे परिवारात जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत, असा आरोप केला होता. यानंतर अमृता फडणवीस यांनीही रिटि्वट करीत भाजपवर निशाणा साधला होता. त्याला शिवसेनेच्या नेत्या डॅा. नीलम गोऱ्हे यांनी उत्तर दिले होते. 

बिहार निवडणुकीत शिवसेनेला आलेल्या अपयशाबाबत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला डिचवले होते. शिवसेनाचा उल्लेख 'शवसेना' करून अमृता यांनी टि्वट करून शिवसेनेवर टीका केली आहे. आपल्या टि्वटमध्ये अमृता म्हणतात की 
का हय ये - शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे ! काय चाल्लय तरी काय - शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे ! महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद.

अमृता फडणवीस यांच्या या टि्वटला आता डॅा. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गोऱ्हे यांनी टि्वट करून फडणवीस यांची खिल्ली उडविली आहे. गोल्हे टि्वटमध्ये म्हणतात, "एका शब्दाचे महत्व असते. 

#अमृताशब्दातील 'अ' चे भान महत्वाचे अमृताताई. या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत, शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील "अ" मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, मन स्वास्थ चांगले राहते, आणि हो शिवसेनाच रुग्णवाहिका आणि अंतिम शव वाहिनी च्या वेळेस सगळ्यात आधी आठवते आजही हे देखील विसरु नका; आपल्या नावात "अ" च महत्व आहे ते निघाले तर "मृता" राहिल , शिवसेनेची काळजी करू नका, आपले मानसिक स्वास्थ जपा, "अ" मंगल विचार मनात आणणे "अ" योग्य बरे का !!ही दिपावली आपल्या ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो..."  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख