नाईकसाहेब मला म्हणाले हे खाते घे; पण त्या लाटणेवाल्यांना फक्त संभाळ

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अनेकांनी योगदान दिले. काहींची आठवण प्रकर्षाने होते यात मृणालताईंचे नाव आल्याशिवाय राहणार नाही.
  Mrinal Gore, Sharad Pawar  .jpg
Mrinal Gore, Sharad Pawar .jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते आज (ता. १८ सप्टेंबर) मृणालताई गोरे दालनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई व अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची उपस्थिती होती. केशव गोरे स्मारक ट्रस्टच्यावीतने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार यांनी मृणालताई गोरे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अनेकांनी योगदान दिले. त्या अनेकांपैकी काहींची आठवण प्रकर्षाने आपल्या सगळ्यांना होते, त्यात मृणालताईंचे नाव आल्याशिवाय राहत नाही. असे पवार म्हणाले. (Memories of Mrinal Gore awakened by Sharad Pawar)    

यावेळी पवार म्हणाले, गोरेगावातील केशवराव गोरे स्मारक ट्रस्टच्या इमारतीत समाजवादी चळवळीतील मृणालताई गोरे नावाच्या झंझावाताचा कलाविष्कार त्यांच्या संघर्षमय प्रवासाची ओळख दाखवणारा व नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल! वैद्यकीय शिक्षण सोडून देऊन सामाजिक रोगावर उपचार करण्यासाठी चूलघरातील लाटणे, हंडे आणि थाळ्यांसारखी हत्यारे हाती घेऊन संघर्ष उभा करणाऱ्या मृणालताईंना कलादालनाच्या रूपाने दिलेली खरी श्रद्धांजली आहे! हा छोटेखानी कार्यक्रम असला तरी प्रत्येकाच्या मनाला आवडणारा हा सोहळा आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अनेकांनी योगदान दिले. काहींची आठवण प्रकर्षाने होते यात मृणालताईंचे नाव आल्याशिवाय राहणार नाही.  

  Mrinal Gore, Sharad Pawar  .jpg
CID : परमबीर सिंह नक्की आहेत तरी कुठे? 

''मृणालताईंना डॉक्टर व्हायचे होते. मात्र मेडिकलचे शिक्षण न घेता समाजातील प्रश्नांचे दुखणे दूर करण्यासाठीच आपण अधिक लक्ष दिले पाहिजे. हे सूत्र मनामध्ये ठेवून सार्वजनिक आणि विशेषतः समाजवादी चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. राजकारणाच्या विविध टप्प्यातून लोक पुढे जातात. यामध्ये मृणालताई याचे आदर्श उदाहरण आहे. त्याकाळात गोरेगाव ही ग्रामपंचायत होती, पुढे महानगरपालिकेचा भाग झाली. मृणालताईंनी ग्रामपंचयात, महापालिका, विधानसभा, लोकसभा अशा सर्व पातळ्यांवर काम केले. लोकांनी त्यांचे कर्तृत्व, त्यांची बांधीलकी लक्षात घेऊन मृणालताईंना त्याप्रकारे साथ दिली.'' असे पवार यांनी सांगितले.  

''आज मुंबईचे चित्र बदलत आहे. गोरेगावात मी भाताची शेती, नारळाची झाडे पाहिली होती. आता मात्र कुठे आलोय याचा पत्ता लागत नाही. यापेक्षा भयाण चित्र हे गिरणगावचे झाले आहे. मला मुंबईमध्ये येण्याची संधी जेव्हा मला मिळाली तेव्हाचे गिरणगाव हे वेगळे होते. काँग्रेस पक्षात काम करण्याची संधी मला १९६२ मध्ये मिळाली. त्यावेळी मी खेडगल्लीत राहायचो. सकाळी भोंगा वाजल्यानंतर लगबगीने कामावर जाणारा कामगार हे वेगळच चित्र होत. आता याच गिरणगांवात गेल्यावर तिथे कामगार दिसत नाहीत, गिरणी दिसत नाही. भल्यामोठ्या इमारती पाहायला मिळतात. तीच परिस्थिती गोरेगाव येथे पहायाल मिळते. या बदलत्या चित्रानुसार लोकांच्या समस्या समजून त्याच्याशी सहमत होण्याची भूमिका ताईंनी आपल्यामध्ये ठेवली त्याप्रमाणे त्यांची वाटचाल सुरू होती.'' असेही पवार म्हणाले. 

''आम्ही विधिमंडळात एकत्र होतो. बरेवाईट संबंध होते. राजकीय मतभेद प्रचंड होते. व्यक्तिगत सलोखाही तितकाच होता. १९७२ला वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात मला गृह राज्यमंत्री पदाची पहिली संधी मिळाली. भाऊसाहेब वर्तक त्यावेळी अन्न व नागरी विभागाचे मंत्री होते. महागाईचा प्रश्न होता. त्याचे नेतृत्व अहिल्याताई व मृणालताईंनी घेतल्याचे आम्ही पाहिले. यात प्रचंड मोठा संघर्ष त्यांनी मुंबईत केला. वर्षभर हा संघर्ष सुरू होता. दरम्यान नाईकसाहेबांनी मला बोलावून घेतले आणि गृहखात्यासोबत अन्न व नागरी विभागाचे खाते घे आणि फक्त या लाटणेवाल्यांना साभाळायचे इतकेच काम कर असे सांगितले. साहजिकच यासाठी ताईंशी सुसंवाद ठेवल्याशिवाय पर्याय नव्हता. हे काम करताना थोडा जरी विलंब झाला तर लाटण्याचा प्रसाद मिळाल्याशिवाय गत्यंतर नव्हते,'' असे पवार म्हणाले.   
 Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com