PNB SCAM : मेहुल चैाकसीचे भारतातील प्रत्यार्पण लांबणीवर - mehul choksi news dominica court orders to send choksi back to antigua | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

PNB SCAM : मेहुल चैाकसीचे भारतातील प्रत्यार्पण लांबणीवर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जुलै 2021

डोमिनिका सरकारकडून मेहुल चोकसीला भारतात सोपवणार असं सांगितलं होतं

नवी दिल्ली : हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी मेहुल चोक्सीला.mehul choksi अँटिग्वा येथे परतला आहे. न्यायालयाने त्याला नुकताच जामीन दिला आहे.mehul choksi news dominica court orders to send choksi back to antigua

डोमिनिकाच्या dominica न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्याला अँटिग्वा antigua येथे पाठविण्यात येत असल्याचे डोमिनिकाच्या न्यायालयानं म्हटलं आहे. सुरुवातीला डोमिनिका सरकारकडून मेहुल चोकसीला भारतात सोपवणार असं सांगितलं होतं, तो अँटिग्वा येथे गेल्याने त्याला परत आणण्याचे भारताचे प्रयत्न सध्या तरी अपयशी ठरले आहेत.

मेहुल चैाकसीला परत आणण्यासाठी भारत सर्व पातळ्यावर प्रयत्न करीत आहे. यातच मेहुलला परत अँटिग्वा येथे पाठविण्याच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे भारतातील त्याचे प्रत्यार्पण लांबले आहे. मेहुल चैाकशी डोमिनिका येथून अँटिग्वा येथे गेला तर त्यांच्या प्रत्यार्पण प्रक्रियेत अडचणी येतील, असे भारतीय अधिकाऱ्यांचे मत आहे. कारण एकदा तो अँटिग्वा येथे गेला तर तो परत डोमिनिका येथे येणार नाही, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. 

''प्रकृती बरी झाल्यावर पुढील सुनावणीसाठी त्याला पुन्हा डोमिनिका येथे यावे लागेल,'' असे डोमिनिकाच्या न्यायालयाने म्हटलं आहे. तर भारताने म्हटलं आहे की, मेहुल चैाकसी हा भारताचा नागरिक आहे. त्याने भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली होती मात्र, परराष्ट्र मंत्रालायने त्यांचा हा अर्ज नामंजूर केला आहे. गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात न्यायालयात ही सुनवाई झाली होती. प्रकृती बरी नसल्याने मेहुल चैाकशी न्यायालयात हजर राहिला नाही. तो रूग्णालयातून सुनवाईसाठी उपस्थित राहत होता. पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोकसी हा भारतातून अँटिग्वा येथे पळून गेला आहे. येथून तो अन्य देशात पळून जाण्याच्या बेतात असताना त्याला डोमिनिका येथे अटक करण्यात आली होती. 

अमिताभ बच्चन यांच्याकडून मनसेला मोठेपणा दाखविण्याची 'प्रतिक्षा'  
मुंबई : बॉलिवूडचे महानायकअमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या संरक्षक भिंत रस्ता रुंदीकरणात येत आहे. ही भिंत पाडावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे. रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अन्य इमारतींवर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली तीच कारवाई महानगरपालिकेने महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर का केली नाही, असा प्रश्न  मनसेनी पोस्टरच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला विचारला आहे. मनसेने बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्यासमोर पोस्टर्स लावून आंदोलन केलं. दोन आठवडे होऊन ही या भिंतीवर कारवाई केली नाही, असा हा प्रश्न मनसेने उपस्थित केला.  याबाबतची नोटिस महापालिकेने महानायक बच्चन यांनी दिली आहे. 
Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख