मेहबूबा यांनी पाकिस्तानाच चालते व्हावे, भाजपच्या नितीन पटेलांचा इशारा  - Mehbooba should be running in Pakistan, warns BJP's Nitin Patel | Politics Marathi News - Sarkarnama

मेहबूबा यांनी पाकिस्तानाच चालते व्हावे, भाजपच्या नितीन पटेलांचा इशारा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

जम्मू आणि काश्‍मिरमधील 370 कलम केंद्रातील मोदी सरकारने रद्द केले आहे.

अहमदाबाद : जम्मू आणि काश्‍मिरातील 370 कलम कायम ठेवण्याची मागणी करणाऱ्या पीडीपीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानाच चालते व्हावे असा इशारा गुजरातचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नितीनन पटेल यांनी दिला आहे. 

जम्मू आणि काश्‍मिरमधील 370 कलम केंद्रातील मोदी सरकारने रद्द केले आहे. त्यानंतर राज्यातील पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्ससह काही पक्षाच्या नेत्यांना बंदी बनविण्यात आले होते. काही दिवसापूर्वी मेहबूबा यांची तर त्यापूर्वी फारूख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांची सुटका करण्यात आली होत्या. त्यांच्या सुटकेनंतर हे नेते मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. 

फारुख अब्दुल्ला यांनी तर देश सोडण्याची भाषा करतानाच 370 कलम चीनच्या मदतीने पुन्हा आणले जाईल असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्यापाठोपाठ मेहबूबा मुफ्ती याही केंद्रातील मोदी सरकारवर टीका करीत आहेत. राज्यातील 370 कलम कायम ठेवण्यात यावे अशी मागणी त्या करीत आहेत. याबाबत बोलताना नितीन पटेल यांनी मेहबूबा यांच्यावर टीका केली आहे. गेल्या दोन दिवसापासून मुफ्ती या मोदी सरकारवर टीका करीत आहेत. 

ते म्हणाले, की मेहबूबा यांना जर भारत आणि या देशाचे कायदे मान्य नसतील त्यांनी सहकुटुंब पाकिस्तानात चालते व्हावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या सुरक्षेतेसाठी एनआरसी कायदा आणला तसेच जम्मू काश्‍मिरातील वादग्रस्त 370 कलम केंद्राने रद्द केले होते. असे असताना मेहबूबा या पुन्हा 370 कलम कायम ठेवण्याची मागणी करीत आहे हे दुर्दैव आहे. 

मेहबूबा यांना हवे असेल आम्ही विमानाचे तिकीट काढून देण्यास तयार आहे. त्यांनी थेट कराचीला आपल्या सहकुटुंबासह चालते व्हावे.ज्यांना देशाचे कायदे मान्य नाहीत त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही असेही पटेल यांनी म्हटले आहे. पटेल हे बडोद्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्यांनी आपल्या भाषणात मुफ्ती यांना लक्ष्य केले आहे. 

दरम्यान, नितीन पटेल यांच्यासह भाजपचे नेते मेहबूबा मुफ्ती यांच्यावर टीका करीत आहेत. मात्र याच भाजपने जम्मू काश्‍मिरातील फारूख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने मेहबूबा यांना पाठिंबा दिला होता. भाजपने मेहबूबा यांच्याशी युती केली होती. पुढे भाजपने त्यांचा पाठिंबा काढून घेतला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख