लॅाकडाऊनमध्ये दोन मुलींची लग्न लावणं सरपंचाला भोवलं...पद जाणार अन् लग्नही बेकायदेशीर

लॅाकडाऊनच्या काळात लग्न केल्यास त्या लग्नाची नोंदच न करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
Marriage in lockdown will not be registered order by Collector
Marriage in lockdown will not be registered order by Collector

उज्जैन : कोरोनाचे (Covid-19) नियम धाब्यावर बसवल्याचे कारण देत काही दिवसांपूर्वी त्रिपुरातील जिल्हाधिकाऱ्यांनी दोन लग्नसमारंभांवर छापा टाकला होता. पोलिस फौजफाट्यासह लग्नात घुसलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीवरून मोठा गदारोळ झाला. त्यानंतर त्यांना निलंबित करून बदली करण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी कोरोनाचे नियम पायदळी तुडवत लग्न उरकली जात आहेत. त्यावर आता एका जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर उपाय शोधला आहे. (Marriage in lockdown will not be registered order by Collector)

लॅाकडाऊनच्या काळात लग्न केल्यास त्या लग्नाची नोंदच न करण्याचा निर्णय मध्य प्रदेशातील उज्जैनचे जिल्हाधिकारी आशीष सिंह यांनी घेतला आहे. लॅाकडाऊन असूनही लग्न होत असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांनी माध्यमांना सांगितले की, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. पण या स्थितीतही अनेक गावांमध्ये लग्न होत आहेत. तिथे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे आढळून आले आहे.

लग्नसमारंभ पुढे ढकलण्याचे सांगण्यात आले आहे. तरीही काही ठिकाणी लग्न होतच आहते. वडनगरमध्ये तर सरपंचाच्या घरचेच लग्न होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना पदावरून हटवण्याची कारवाईही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता कठोर पावले उचलली जाणार आहे. जिल्ह्यात पाच मेनंतर झालेल्या लग्नांची नोंदणी न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चुकून एखाद्या लग्नाची नोंद केली गेली असल्यास तीही रद्द केली जाईल. त्यांना लग्नाचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही. सर्व नगरपालिका, ग्रामपंचायतींना याबाबत आदेश दिल्याचे आशीष सिंह यांनी स्पष्ट केलं. 

सरपंचांनी दोन मुलींची लग्न लावली

वडनगर तालुक्यातील रुनिजा गावच्या सरपंचांच्या दोन मुलींची सहा मे रोजी लग्न झाले. जनता कर्फ्यूच्या काळात लग्न न करण्याचे स्पष्ट आदेश होते. पण त्यानंतरही धुमधडाक्यात लग्न झाले. पण हे लग्न सरपंचाला चांगलेच भोवले आहे. सरपंचपदावरून त्यांना हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन्ही मुलींच्या लग्नाची नोंदणीही होणार नाही. 

दरम्यान,  देशातील कोरोना (Covid19)  रुग्णसंख्येतील (Patients) वाढ सुरूच असली तरी या वाढीचा वेग आता कमी होऊ लागला आहे. देशात 21 एप्रिलनंतर प्रथमच नवीन रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख  81  हजार 386 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 106 जणांचा मृत्यू (Covid Deaths) झाला आहे. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com