जामनेरात फडणवीसांसोबत भाजपचे सर्व नेते उपस्थित.. पण चर्चा खडसेंच्या अनुपस्थितीची - many bjp leaders share dais with fadnavis but khadse avoid it | Politics Marathi News - Sarkarnama

जामनेरात फडणवीसांसोबत भाजपचे सर्व नेते उपस्थित.. पण चर्चा खडसेंच्या अनुपस्थितीची

कैलास शिंदे
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

खडसेंची नाराजी अद्याप जाईना...

जळगाव : जामनेराच्या  कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी अनुपस्थिती असल्याने त्याचीच चर्चा झाली. मात्र या कार्यक्रमला स्नुषा रक्षा खडसे यांच्यासह खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले भुसावळ नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व आमदार यांनी मात्र या कार्यक्रमाला उपस्थिती लावली

जामनेर येथे आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून ग्लोबल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला खडसे यांना महाजनांनी निमंत्रण दिले होेते. मात्र आपण नाराज असल्याचे दाखवत फडणवीस यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येण्याचे टाळले. खासदार सुभाष भामरे, उमेश पाटील, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, माजी खासदार उल्हास पाटील हे प्रमुख या वेळी उपस्थित होते. स्वतः महाजन यांनी खडसे यांना निमंत्रण दिले होते. हा बिगर राजकीय कार्यक्रम असल्याने ते येतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. मात्र न येऊन खडसेंनी आपण भाजप नेत्यांशी संवाद साधायला तयार नाही, असेच दाखवून दिले आहे. याचा राजकीय अर्थ काय निघणार यावर आता अटकळी सुरू आहेत. खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा अनेक दिवस सुरू आहे. खडसेंनी त्याविषयी थेट भाष्य केले नाही. मात्र भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित होते.  

या रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला खडसे नसले तरी त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे, खडसे समर्थक आणि भुसावळचे आमदार संजय सावकारे व लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांनी उपस्थिती लावली.

या  रुग्णालयाच्या उद्घाटन वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमदार गिरीश महाजन यांची रुग्ण सेवा गेल्या 20 वर्षा पासून सुरू आहे कोरोनाच्या काळात राज्यातील सर्व आरोग्य सेवा उघडी पडली आहे. 15 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. तर 40 हजार नागरिकांनाच मृत्यू झाला आहे. कोरोनाने भेदभाव केलेला नाही आहे  त्यामुळे स्वस्त दरात हॉस्पिटल सुरू करून एक मोठी रुग्ण सेवा करीत आहे. राज्यातील आरोग्यसेवा सक्षम करण्याचे शासन व खाजगी  संस्थांना मोठे आव्हान आहे आगामी काळात सर्वांनी ते पेलण्याची गरज आहे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख