मनसुख हिरेन प्रकरणात नवा ट्विस्ट : मारून बुडविले की बुडवून मारले?  - mansukh diatom report if it was thrown after the murder how did the diatom report come positive | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

मनसुख हिरेन प्रकरणात नवा ट्विस्ट : मारून बुडविले की बुडवून मारले? 

सूरज सावंत
शुक्रवार, 18 जून 2021

मनसुख यांची आधी हत्या केली. त्यानंतर  त्याला खाडीत टाकल्याचेही NIA नं न्यायालयात सांगितलं.

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( NIA) या महिन्यात ५ जणांना अटक केली आहे. एन्काऊटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना काल एनआयएने अटक केली. शर्मा हे NIA च्या कोठडीत आहे. मनसुख यांची आधी हत्या केली त्यानंतर त्यांना खाडीत टाकल्याचेही NIA नं न्यायालयात सांगितलं. तसे असेल तर मग डायटम रिपोर्ट पाँझिटिव्ह कसा आला असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.mansukh diatom report if it was thrown after the murder how did the diatom report come positive

NIA ने दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या राञी म्हणजेच 4 मार्चला सचिन वाझे आणि सुनील माने यांनी मनसुख यांना त्यांच्या घरून फोन करुन बोलावले होते. मनसुख, वाझे आणि मानेसह घोडबंदर परिसरात गेला होता. त्यावेळी  लाल कलरची गाडीत मनीष गाडी चालवत होता. तर संतोष शेलार, आनंद जाधव आणि मनीष आणि सतीश हे होते. या चौघांनीच मनसुखची हत्या करुन नंतर त्याला मुंब्रा खाडीत फेकून दिलं.

प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हेच या संपूर्ण कटाचे मुख्य सूञधार असल्याचे NIA नं काल कोर्टात सांगितले आहे. मनसुखची आधी हत्या केली. त्यानंतर  त्याला खाडीत टाकल्याचेही NIA नं न्यायालयात सांगितले. तसे असेल तर मग डायटम रिपोर्ट पाँझिटिव्ह कसा आला असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. NIA ने गुरूवारी मनसुख हिरेन आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणात प्रदीप शर्मा, मनीष सऩी व सतीष मोथकुरी उर्फ तन्नी याला अटक केली. जर मनसुख यांची हत्या झाली मग डायटम रिपोर्ट कसा काय पाँझिटिव्ह आला असे प्रश्न  विचारला जात आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांच्या कुंटुबियांना ही हत्या असल्याचं सांगत तपास यंञणेवर संशय व्यक्त करत मृतदेहाचा ताबा घेण्यास नकार दिला होता. शवविच्छ्दनाचे रेकाँर्डिग  केले नव्हते. कालांतराने शवविच्छेदन अहवाल समोर आला. त्यात मनसुखचा बुडून मृत्यू झाल्याचं म्हटलं होते. त्यानंतर खाञीसाठी डायटम चाचणी करण्यात निर्णय घेण्यात आला.

डायटम बोन रिपोर्ट म्हणजे काय?
वाहत्या पाण्यात डायटम नावाचा पदार्थ असतो. एखादी व्यक्ती पाण्यात बुडाल्यास त्याच्या शरीरात डायटम शिरतो. या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची डायटम टेस्ट पॉझिटिव्ह येते. पण मृतदेह पाण्यात फेकला गेल्यास त्याच्या शरीरात डायटमचा शिरकाव होत नाही. त्यामुळे त्याची डायटम टेस्ट निगेटिव्ह येते. मनसुखच्या शवविच्छेदन  करते वेळी घटनास्थळी सचिन वाझे उपस्थित होते. वाझे त्यावेळी डाँक्टरांच्या थेट संपर्कात होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात तपास अधिकारी आणि शवविच्छेन अहवाल तयार करणाऱ्या डाँक्टरांचाही समावेश असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे शवविच्छेदन करणारे डाँक्टर हे NIAच्या रडारवर आले. जर मनसुखची हत्या झाली मग डायटम रिपोर्ट कसा काय पाँझिटिव्ह कसा आला असे प्रश्न विचारत आहे. लवकरच या तीन डॉक्टरांना NIA चौकशीला सामोरे जाणार आहे.

४ मार्च रोजी हिरेन यांची हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह खाडीत मिळाला. त्यावेळी त्यांच्या तोंडावर मास्क होता व आतमध्ये तोंडावर रुमाल बांधलेले होते. हे रुमाल वापरुनच हिरेन यांना बेशुद्ध करण्यात आले असावे, असा एनआयएचा संशय आहे. दरम्यान, घटनास्थळी वाझे (Sachin Waze) उपस्थित होते अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. एटीएस (ATS)च्या रिमांडमध्ये ही माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. मनसुख यांची हत्या करून त्यांच्या तोंडावर रुमाल ठेवून नंतर स्कार्फ सारखा मास्क लावण्यात आला आणि मृतदेह खाडीत फेकला गेला अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. हिरेन यांचा मृतदेह ज्यावेळी सापडला त्यावेळी त्यांच्या तोंडावर सफेद रुमाल होते. मात्र हे रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब झाले आहेत.  या अहवालात छेडछाड केल्याचा आरोप केला जात आहे.  
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख