या वादळानं देशाला हादरवून टाकलंय!  - Mann ki baat Second wave of corona has shaked us says PM Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

या वादळानं देशाला हादरवून टाकलंय! 

वृत्तसंस्था
रविवार, 25 एप्रिल 2021

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दररोज उच्चांक गाठत आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दररोज उच्चांक गाठत आहे. जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्ण आता भारतात आढळून येत आहेत. त्यामुळे देशभरात हाहाकार निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांना बेड, अॅाक्सीजन मिळणे कठीण झाले आहे. रुग्णालयाच्या दारातच रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे भयाण दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांमध्येही मोठ्या प्रमाणावर भिती निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज 'मन की बात'मध्ये कोरोना संकट देशाची कठीण परीक्षा घेत असल्याचे म्हटले आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर देशात आत्मविश्वास निर्माण झाला होता. पण या वादळाने देशाला हादरवून टाकलं आहे. या संकटाचा सामना करताना आपल्याला तज्ज्ञांच्या मतांना प्राधान्य द्यायचे आहे. या संकटकाळात लशीचे महत्वही अधोरेखित झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 

पंतप्रधान म्हणाले, मी नागरिकांना आवाहन करतो की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्व राज्यांना मोफत लस पाठविली जात आहे. त्याचा फायदा 45 वर्षांवरील नागरिकांना होत आहे. मोफल लशीचा कार्यक्रम यापुढेही सुरू राहील. देशात 1 मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत असून त्यामध्ये 18 वर्षापुढील लोकांना लस दिली जाईल. या लढाईमध्ये केंद्र सरकार राज्यांना सर्वप्रकारे मदत करत आहे. 

आज देशातील वैद्यकीय क्षेत्रातील लोक आणि फ्रंटलाईन वर्कर्स सेवा करत आहेत. अनेक लोकही या सेवेमध्ये मागे नाहीत. लोक पुढे येत आहे. कोरोना वाढू नये यासाठी अनेक युवक आणि स्थानिकांच्या मदतीने प्रयत्न केले जात आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

दरम्यान, देशात सध्या करोनाचा संसर्ग अतिशय झपाट्याने वाढताना दिसत आहे. दररोज लाखांचा घरात नवीन रूग्ण आढळून येत आहेत. शिवाय, रूग्णांच्या मृत्यू संख्येही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी देखील रूग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख