पुन्हा तुरूंगात जाण्यासाठी थेट पंतप्रधान मोदींची हत्या करण्याची धमकी - A Man made a phone call with a death threat to PM Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

पुन्हा तुरूंगात जाण्यासाठी थेट पंतप्रधान मोदींची हत्या करण्याची धमकी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 जून 2021

दिल्लीतील खजुरी खास चौक परिसरातून सलमान उर्फ अरमान या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याची धमकी दिल्याचा फोन रात्री पोलिस नियंत्रण कक्षात आला होता.  या प्रकारामुळं सुरक्षा यंत्रणा दक्ष झाल्या आहेत. पोलिस व इतर सुरक्षा यंत्रणांनी राबवलेल्या शोधमोहिमेत एकाला अटक करण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. (A Man made a phone call with a death threat to PM Narendra Modi) 

दिल्लीतील खजुरी खास चौक परिसरातून सलमान उर्फ अरमान या संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणून गुप्तचर विभाग (IB) आणि विशेष तपास अधिकारी त्याच्याकडे चौकशी करत आहेत. तो गाझियाबादमध्ये लोणी भागात राहणारा असल्याचे समजते. तसेच तो व्यसनी असल्याचेही निदर्शनास आले आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : पोलीस निरीक्षकाकडूनच सहकारी महिलेवर बलात्कार अन् मारहाण

सलमान हा 22 वर्षांचा असून सध्या एका गुन्ह्यात जामीनावर बाहेर आला आहे. चौकशीदरम्यान त्याने ही माहिती दिली. तसेच पुन्हा तुरूंगात जाण्यासाठी पंतप्रधानांची हत्येची धमकी देणारा फोन केल्याचे त्याने सांगितल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित हा प्रकार असल्याने सुरक्षा यंत्रणांकडून कसून चौकशी केली जात आहे. 

हेही वाचा : दिलासादायक : लस घेतलेल्यांना कोरोना संसर्ग झाल्यास मृत्यूचे प्रमाण शुन्य

सलमान याने स्वत:हून फोन केला की, त्याला कोणी फोन करायला सांगितले, याचीही माहिती घेतली जात आहे. रात्री धमकीचा फोन आल्यानंतर स्थानिक पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणांही कळवण्यात आले होते. तेव्हापासून विविध पातळ्यांवर हा तपास केला जात आहे. पुन्हा तुरूंगात जाण्यासाठी फोन केल्याची कबुली दिली असली तरी सुरक्षा यंत्रणांकडून अधिक चौकशी केली जात आहे. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख