ममता बॅनर्जी यांचे सरकार ऍन्टी हिंदू, भाजप अध्यक्ष नड्डांचा हल्लाबोल  - Mamata Banerjee's government is anti-Hindu, BJP president Nadda's attack | Politics Marathi News - Sarkarnama

ममता बॅनर्जी यांचे सरकार ऍन्टी हिंदू, भाजप अध्यक्ष नड्डांचा हल्लाबोल 

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

यापूर्वीचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ममतादिदिंना जितके म्हणून अडचणीत आणता येईल तितके  आणण्याचा प्रयत्न केला होता.

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार हिंदुत्वाच्या विरोधात असल्याची टीका भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज केली आहे. 

पश्‍चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने ममतादिदि यांना घेरण्याचा प्रयत्न गेल्या दोन तीन वर्षापासून सुरू ठेवला आहे. जसजशा निवडणूक जवळ येऊ लागल्या आहेत तसतसा भाजप अधिक आक्रमक झालेला दिसून येत आहे.

यापूर्वीचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ममतादिदिंना जितके म्हणून अडचणीत आणता येईल तितके अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. आजही अमितभाई ममतादिदिंवर जोरदार टीकास्त्र सोडत असतात. कोणत्याही परिस्थितीत पश्‍चिम बंगालची सत्ता भाजपला मिळवायची आहे. 

हिंदूप्रमाणे या राज्यात मुस्लिमांची संख्याही तुलनेने अधिक आहे. ममतादिदी या मुस्लिमांचे लांगुलचालन करतात आणि हिंदूवर अन्याय करतात असा आरोप भाजपची मंडळी सातत्याने करीत आहेत. तशीच टीका आज नड्डा यांनी ममतादिदि यांच्यावर केली. ममता बॅनर्जी सरकारची मानसिकता हिंदूविरोधी असून मुस्लिमांचे तुष्टीकरण केले जात आहे. हे सरकार हिंदूविरोधी असल्याची जोरदार टीका नड्डा यांनी केली आहे. 

पश्‍चिम बंगाल भाजपने आज काही नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या आहेत. या निवडीनंतर पदाधिकाऱ्यांना नड्डा यांनी व्हर्च्यअल बैठकीत मार्गदर्शन केले. पदाधिकाऱ्यांनी संवाद साधताना ते ममता बॅनर्जी सरकारला लक्ष्य केल्याशिवाय गप्प कसे राहतील.

नड्डा म्हणाले, की अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन संपूर्ण देश पाहत होता त्यावेळी त्यावेळी म्हणजे गेल्या पाच ऑगस्टरोजी त्यांनी राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे या राज्यातील जनतेला भूमिपूजनाचा कार्यक्रम पाहता आला नाही किंवा साजरा करता आला नाही. मात्र हा लॉकडाऊन बकरी ईदमुळे मागे घेतला. त्यामुळे या सरकारची मानसिकता कोणती आहे हे लक्षात घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. 

राज्यात आतापर्यंत शंभर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत याकडेही नड्डा यांनी लक्ष वेधले 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख