नंदीग्राममध्ये ममतांची अधिकारींवर आघाडी; तृणमूल राज्यात दोनशे पार  - Mamata Banerjee leads again | Politics Marathi News - Sarkarnama

नंदीग्राममध्ये ममतांची अधिकारींवर आघाडी; तृणमूल राज्यात दोनशे पार 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 2 मे 2021

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे.

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसने चांगली आघाडी घेत भाजला मागे सोडले आहे. तृणमूल काँग्रेसने २०७ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ८१ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष ३ जागांवर आघाडीवर आहे. मात्र, तृणमूल काँग्रेस आघाडीवर असताना ममता बॅवर्जी पिछाडीवर होत्या. तो तृणमूलसाठी धक्का मानला जात होता. 

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये शुभेन्दु अधिकारी यांनी ७००० हजार मतांची आघाडी घेतली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी ती आघाडी तोडत पुन्हा अधिकारी यांच्यावर २७०० मतांची आघाडी घेतल्यामुळे तृणमूला दिलासा मिळाला आहे. 

बेळगावात मोठी उलथापालथ: काँग्रेसचे जारकीहोळी ९ हजार मतांनी आघाडीवर

ममता बॅनर्जी या नंदीग्रामधून विडवणूक लढवत असल्यामुळे भाजपाने या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रीत केले होते. त्यासाठीच भाजपाने या मतदारसंघासाठी एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सहकारी आणि तृणमूलचे फायरब्रँड नेते सुवेंदू अधिकारी यांना पक्षात आयात करून उमेदवारी दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय म्हणाले होते की, नंदीग्राममध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जवळपास 25 हजार मतांनी पराभूत होतील. 

पश्चिम बंगाल निवडणुकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र, तृणमूलने निर्णायक आघाडी घेल्यामुळे हा अंदाज फोल ठरतांना दिसत आहे. पश्चिम बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकत पणाला लावली होती. त्यासाठी भाजपने अनेक खासदारांनाही विधानसभा नवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मागील २००६ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे वोट शेअर ४४.९ टक्के होता तर भाजपचा १०.२ टक्के होता. काँग्रेस लेफ्ट आघाडीला ३७.९ टक्के मते मिळाली होती तर इतरांच्या खात्यात ७ टक्के मते होती.

यामुळे कुंभमेळा अन् भारतातील निवडणुकांवर बोलणार नाही ; अदर पूनावालांची भूमिका 
 

आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला होता. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. दोन ठिकाणी निवडणूक झालेली नाही. एकीकडे कोरोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नाही. 

ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहे. जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देणार असल्याचे सुरुतीच्या कलामध्ये दिसून येत आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान निर्माण केले होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जोरदार प्रचार केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. २९४ जागांच्या विधानसभेत १४७ बहुमताचा आकडा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख