न्यायाधीशांना हटविण्याची मागणी ममतांना पडली महागात ; पाच लाखांचा दंड ठोठावला

ममता बॅनर्जी यांना उच्च न्यायालयानं पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.
न्यायाधीशांना हटविण्याची मागणी ममतांना पडली महागात ; पाच लाखांचा दंड ठोठावला
0Sarkarnaa_20Banner_20_2869_29 - Copy.jpg

नवी दिल्ली : कोलकाता उच्च न्यायालयाने  High Court पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banerjee यांना झटका दिला आहे. त्यांना पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कैाशिक चंद यांना हटविण्याची मागणी केली होती. mamata banerjee faces 5 lakh rupees fine for seeking recusal of calcutta hc judge

कैाशिक चंद यांची भारतीय जनता पक्षाशी जवळीक असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता.  तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांचा अर्ज कैाशिक यांनी फेटाळला होता. कैाशिक यांनी आपल्या व्यक्तीगत विचारावर याचा निकाल दिला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. हा खटला त्यांनी आपल्या खंडपीठातून काढून टाकला होता. 

नंदीग्राम विधानसभा मतदार संघात ममता बॅनर्जी यांचा पराभव भाजपचे शुभेंद्रु अधिकारी यांनी केला आहे. याला बॅनर्जी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.  त्यांची सुनवाई कैाशिक यांच्या खंडपीठाकडे होती. कैाशिक यांना या सुनवाईतून हटविण्याची मागणी बॅनर्जी यांनी केली होती. कैाशिक यांची भाजपशी जवळीक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या मागणीबाबत न्यायालयाने बॅनर्जी यांना पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.  

''ममता बॅनर्जी यांनी न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असून त्यांना ठोठावण्यात आलेला पाच लाखांचा दंड हा कोरोना झालेल्या वकीलांच्या परिवारासाठी खर्च करण्यात यावा,''  असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटलं आहे. या निकालानंतर  ममता बॅनर्जी यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. 

नितेश राणेंच्या आक्षेपार्ह विधानानंतर शिवसैनिकांचा राडा!
मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे नेते, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली.  आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपने विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. आणि विधानसभेच्या बाहेरच प्रतिविधानसभा भरवली होती. याठिकाणी भाषण करीत असताना भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं होतं. याला शिवसैनिकांनी उत्तर दिलं आहे.

Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in