संभाजीराजे म्हणाले, ''मला मुख्यमंत्री करा, बहुजनांचे सर्व प्रश्न सोडवतो'' - Make me the Chief Minister said Sambhaji Raje | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

संभाजीराजे म्हणाले, ''मला मुख्यमंत्री करा, बहुजनांचे सर्व प्रश्न सोडवतो''

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 जुलै 2021

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी  संभाजी राजेंना प्रश्न विचारला, की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या. अशी मागणी का तुम्ही करत नाहीत.

बीड  : ''मराठा आरक्षणा संदर्भात ओबीसीमध्ये आरक्षण द्या. हा प्रश्न सत्तेतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विचारा , मागच्या मुख्यमंत्र्यांनाही हाच प्रश्न विचारा. पालकमंत्र्यांनाही हा प्रश्न विचारायचा. आणि जर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल,  तर संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा,'' असे वक्तव्य छत्रपती संभाजीराजेंनी बीडमध्ये मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेत बोलताना केले आहे. Make me the Chief Minister said Sambhaji Raje

संवाद यात्रेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी थेट संभाजी राजेंना प्रश्न विचारला, की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या. अशी मागणी का तुम्ही करत नाहीत. त्यावेळी संभाजीराजे यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत असताना, मी ही मागणी करू शकत नाही. आणि असा प्रश्न मला विचारण्यापेक्षा, तो प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच मागच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना विचारा. तेवढे जमले नाही तर संभाजी राजांना मुख्यमंत्री करा. बहुजनांचे सर्व प्रश्न सोडतो, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. यामुळं छत्रपतीची मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा प्रगट झाली का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

बीडमध्ये संवाद यात्रेच्यावेळी संभाजीराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ''राज्य सरकारकडे सारथी संदर्भात व इतर काही  मराठा समाजाच्या मागण्या दिल्या आहेत.त्या पूर्ण करू, असा शब्द राज्य सरकारने दिला आहे. मात्र, त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. तर छत्रपतींची भूमिका बदलेल. हात वर येतील, बोट समोर येतील, कॉलर वर येईल, बटणे उघडतील, एवढेच नाही तर कपडे देखील डार्क होतील,'' असा इशारा छत्रपती संभाजीराजेंनी राज्य सरकारला दिला आहे. 
 

पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी अज्ञातस्थळी हलवलं..

पुणे : यंदाही राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी नाकारली आहे. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडा तात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलं आहे. त्यांना अज्ञास्थळी हलविण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे हे याबाबत पोलिस प्रशासनाशी चर्चा करीत आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख