छोट्या गणेश मूर्तींची परंपरा कायम ठेवा 'या' खासदारांची मुख्यमंत्र्यांना सूचना

यावर्षी कोरोनाच्या फैलावामुळे अनेक मंडळांनी छोट्या मूर्ती आणण्यास सुरुवात केली आहे. ही परंपरा यापुढेही मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवावी. मंडळांना धातूच्या कायमस्वरुपी मूर्ती ठेवण्यासही सांगावे, असे आवाहन भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले आहे.
खासदार गोपाळ शेट्टी.
खासदार गोपाळ शेट्टी.

मुंबई : यावर्षी कोरोनाच्या फैलावामुळे अनेक मंडळांनी छोट्या मूर्ती आणण्यास सुरुवात केली आहे. ही परंपरा यापुढेही मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवावी. तसेच मंडळांना धातूच्या कायमस्वरुपी मूर्ती ठेवण्यासही सांगावे, असे आवाहन भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले आहे. 


पर्यावरणाचे जतन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक आहे. आता यावर्षी छोट्या मूर्तीं करण्याची चांगली सुरुवात झाली असून ती खंडित करू नये. पुण्यातील मोठ्या मंडळांच्या मूर्त्यांप्रमाणे मुंबईतही मोठी मूर्ती कायमस्वरुपी ठेवावी आणि पुजेसाठी व विसर्जनासाठी छोटी मूर्ती ठेवावी, असेही शेट्टी यांनी सांगितले. 


हल्ली सर्वच मंडळांच्या मूर्तीची उंची किती मोठी आहे. यावर त्या मंडळाचा मोठेपणा ठरतो. यापूर्वीही तत्कालीन महापौर शुभा राऊळ यांनी बाप्पांच्या मूर्तींची उंची कमी करण्याबाबत विचार मांडले होते. 

आता मुख्यमंत्र्यांनी देखील हेच विचार मांडले आहेत. हा बदल कायमस्वरुपी घडविण्यासाठी ही चांगली वेळ आहे. गोव्यात अनेक वर्षांपासून समुद्रात मूर्तीविसर्जनाला बंदी आहे, तर पश्चिम बंगालमध्येही मोहरमच्या मिरवणुकीत मोठी शस्त्रे नेण्यास बंदी आहे, याचा दाखलाही शेट्टी यांनी दिला आहे.

आपल्या परिचयातील एका मंडळाला आपण कायमस्वरुपी धातूची मूर्ती मंडपात ठेऊन तिचे विसर्जन न करण्याचा सल्ला दिल्याचेही ते म्हणाले. पर्यावरण हिताच्या दृष्टीने असे बदल करणे आवश्यक आहे व त्यासाठी हीच वेळ असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपले वजन वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा : आर्थिक संकट असतानाही चार मंत्र्यांना मिळणार नव्या मोटारी


मुंबई : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्र शासनाने चार मंत्र्यांसाठी वाहन खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, क्रीडा मंत्री सुनील केदार आणि त्या खात्याच्या राज्यमंत्री आदिती तटकरे हे चार मंत्री यांना नव्या मोटारी मिळणार आहेत. अर्थमंत्री व  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष सूचनेनुसार ही परवानगी दिल्याचे समजते. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार २० लाख रुपयांच्या आत वाहनखरेदी करण्याची परवानगी आहे. मात्र शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २२ लाख किमतीची इनोव्हा क्रिस्टा ही गाडी खरेदी केली. ही गाडी मुंबईतील मधुबन मोटर्सकडून घेण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com