BHR घोटाळा : झंवरने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दीड हजार वेळा बदलले सिमकार्ड  

मागील नऊ ते दहा महिन्यापासून झंवर नाशिक, मुंबई, गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश, अशा ठिकाणी वेशांतर करुन आणि मोबाइलचे सिमकार्ड बदलून फिरत होता.
 Sunil Zanwar .jpg
Sunil Zanwar .jpg

पुणे : राज्यभर गाजत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी असलेले सुनील झंवर (Sunil Zanwar) (रा. जयनगर, जळगाव) याला मंगळवारी (ता. १० ऑगस्ट) नाशिकमधून पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या अटकेमुळे या घोटाळ्यातील बडा मासा गळाला लागला आहे. (The main accused in BHR scam was arrested)  

या घोटाळ्यात या आधी १८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर झंवर दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भाजप नेते गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून झंवर यांचे नाव चर्चेत आले होते. आता पर्यंतच्या तपासात ६१ कोटी ९० लाख ८८ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. झंवर इंदौरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस तिथे १० दिवस तळ ठोकून होते. झंवरने एका तासासाठी त्याच्या मोबाईलमध्ये नवीन सिमकार्ड टाकले होते. तो वापरत असलेल्या गाडीचीही माहिती पोलिसांना मिळाली होती.   

झंवरने अटकेपासून बचावासाठी पाच महिन्यात दीड हजारापेक्षा जास्त वेळा, सिमकार्ड, मोबाईल, वायफाय, डोंगल बदलले. इंदौरमध्ये असताना दहा दिवसांपूर्वी एका तासासाठी त्यांने मोबाईलमधील सिमकार्ड बदलले आणि गुन्हे शाखेच्या पथकाला त्याचे वायफाय डोंगल व मोबाईलचे लोकेशन मिळाले. त्यांनतर इंदौर ते नाशिक असा प्रवास करुन पथकाने त्याला पकडले. मागील नऊ ते दहा महिन्यापासून झंवर नाशिक, मुंबई, गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश, अशा ठिकाणी वेशांतर करुन आणि मोबाइलचे सिमकार्ड बदलून फिरत होता. 

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने १७ जून रोजी राज्यभरात ठिकठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती छगन झाल्टे यांच्यासह 12 संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सर्व अकरा संशयितांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. पावत्या मॅचिंग करून घडवण्यात आलेल्या अपहारापैकी २० टक्के रक्कम दहा दिवसांत भरण्याच्या अर्टी-शर्तींना अधीन राहून प्रत्येकी एक लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. अकरा संशयितांना अटकेनंतर पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीत असताना त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावर पुणे न्यायालयात गेल्या काही दिवसांपासून कामकाज सुरू होते.   
 Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com