..तर भविष्यात काँग्रेसला वगळून महाविकास आघाडी : बड्या नेत्याचे संकेत - Mahavikas Aghadi will contest elections without Congress Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

..तर भविष्यात काँग्रेसला वगळून महाविकास आघाडी : बड्या नेत्याचे संकेत

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 जून 2021

 तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटितपणाने काम करणे अपेक्षित आहे

मुंबई : "महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील त्यादृष्टीने 'सामना' ने मत व्यक्त केले आहे मात्र, महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते," असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. Mahavikas Aghadi will contest elections without Congress Jayant Patil

कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यावर 'सामना' मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित लढतील असे वृत्त आल्याचा प्रश्न पत्रकारांनी जयंत पाटील यांनी केला असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. "कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सध्या पक्षवाढीसाठी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करत असतील. प्रत्येक पक्षाचं बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. म्हणून तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटितपणाने काम करणे अपेक्षित आहे," असेही जयंत पाटील म्हणाले. 

निवडणूका जवळ आल्यावर कदाचित ते वेगळा विचार करु शकतील पण त्यांनी तसा विचार केला नाही तर मग जे समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील असेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. आता निवडणुका नाहीत त्यामुळे यावर रोज चर्चा कशाला करायची. ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी नक्कीच चर्चा करु. ज्यावेळी निवडणूका होतील त्यावेळी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन चर्चा होईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

तो दिवस लांब नाही, ज्या दिवशी सेनाभवनच्या काचा फुटलेल्या दिसतील.. 
मुंबई :  श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे  मुखपत्र ‘सामना’मध्ये Saamna भाष्य करण्यात आले होते. यावरुन शिवसेना आणि भाजप कार्यक्रर्त्यांमध्ये राडा झाला. या वादामुळे भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभे टाकले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे.  BJP leader Nilesh Rane warns Shiv Sena या प्रकरणावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. आपल्या टि्वटमध्ये निलेश राणे म्हणतात की, दादर मध्ये सेना भवन आहे...दादर कोणाच्या बापाचं नाही. तो दिवस लांब नाही ज्या दिवशी सेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख