महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा  - Mahatma Gandhi s Great-Granddaughter jailed for 7 years  | Politics Marathi News - Sarkarnama

महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 जून 2021

आशिष लता रामगोबिन यांना सोमवारी कोर्टाने दोषी ठरवले.

नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) ५६  वर्षीय पणतीला ६२ लाख रुपयांची फसवणूक व बनवाट कागदपत्रांच्या प्रकरणी डर्बन कोर्टाने सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आशिष लता रामगोबिन यांना सोमवारी कोर्टाने दोषी ठरवले. व्यापारी असल्याचे सांगून त्यांनी स्थानिक व्यावसायिकाची ६२ लाख रुपयांची फसवणूक केली. (Mahatma Gandhi s Great-Granddaughter jailed for 7 years)

लता यांनी नफ्याचे आमिष दाखवून पैसे घेतले होते असे फसवणूक झालेल्या एसआर महाराज यांनी सांगितले. महाराजांनी लताला माल आयात करण्यासाठी व सीमाशुल्क भरण्यासाठी ६० लाख रुपये दिले होते. मात्र, कोणताही माल महाराजा यांच्याकडे पोहोचलाच नाही. लता यांनी आश्वासन दिले होते की या नफ्यातील काही त्या एसआर महाराजांना देणार आहे. 

'अच्छे दिव आले, पेट्रोल शंभर रुपये लिटर झाले'

लता रामगोबिन मानवी हक्क कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिन यांची मुलगी आहे. लता रामगोबिन यांना डर्बन स्पेशलाइज्ड कमर्शियल क्राइम न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर अपील करण्यासाठी परवानगी नाकारली होती. लता रामगोबिन यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये न्यू आफ्रिका अलायन्स फुटवेअर वितरकांचे संचालक महाराज यांची भेट घेतली होती, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.

महाराज यांची कंपनी कपडे, बुटांची निर्मिती, विक्री व परदेशातून माल आयात करते. महाराज यांची कंपनी अन्य कंपन्यांना नफा-समभागांच्या आधारे पैसेही देते. दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) हॉस्पिटल ग्रुप नेटकेअरसाठी तागाचे तीन कंटेनर आयात केले लता यांनी महाराजा यांना सांगितले होते.

खासदाराशी वाद वाढवून राज्यपाल पडले तोंडघशी

आयात व सीमा शुल्क भरण्यासाठी आपल्याकडे पैशाची कमतरता आहे. बंदरावरुन सामान खाली उतरवण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. असे लता यांनी महाराजा यांना सांगितले होते. लताने त्यानंतर महाराज यांना सांगितले की तिला ६२ लाख रुपयांची गरज आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी लताने वस्तू खरेदी केला असलेला एक कागद महाराज यांना पाठवला होता. त्यांनी पाठवलेला हा कागद खोटा असल्याचे समोर आल्यानंतर महाराज यांनी लता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख