Vaccination drive: लसीकरणात देशात महाराष्ट्र आघाडीवर - maharashtra tops the country in overall vaccination of citizen | Politics Marathi News - Sarkarnama

Vaccination drive: लसीकरणात देशात महाराष्ट्र आघाडीवर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 जुलै 2021

सुमारे ८८ लाख जणांना दोन्ही डोस देण्यात आल्याने सर्वाधिक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणारे राज्य म्हणून देशात महाराष्ट्र अग्रभागी आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाही.  राज्यात लसीकरणाला वेग आला आहे. सरकारी आणि खाजगी लसीकरण केंद्रावर लस vaccination घेण्यासाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुमारे ८८ लाख जणांना दोन्ही डोस देण्यात आल्याने सर्वाधिक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणारे राज्य म्हणून देशात महाराष्ट्र अग्रभागी आहे.maharashtra tops the country in overall vaccination of citizen

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत शनिवारी रात्री आठपर्यंत ६ लाख १३ हजार लसीकरण झाले. त्यामुळे आता राज्यात पहिला डोस मिळलेल्यांची संख्या ३ कोटी ४७ हजार एवढी झाली आहे. तर ८८ लाख ३७ हजार नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल्याने सर्वाधिक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणारे राज्य म्हणून देशात महाराष्ट्र अग्रभागी आहे.

लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर असून दोन्ही डोस दिलेल्या नागरिकांची संख्या देशात सर्वाधिक आहे. लसीकरणाला अधिक गती दिल्यास दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या लवकरच १ कोटीचा आकडा पार करू शकेल. लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा  करीत असलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.

शनिवारी रात्री आठपर्यंत सुमारे ६ लाख १३ हजार ८६५ एवढे लसीकरण झाले. त्यामुळे लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ३ कोटींपेक्षा अधिक झाली, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले

पुणे शहर पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात काही भागात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात सध्या जे निर्बंध लागू आहेत तेच कायम ठेवण्यात आले आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत दुकाने उघडता येतील. शनिवार, रविवारी वीकेंडला अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद आहेत. मॉल सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख