Lockdown नाही STOP THE CHAIN : बार, हाॅटेल, केश कर्तनालये बंद, खासगी कार्यालयांत work from home

नवीन नियमावली लवकरच जारी होणार...
uddhav mantarlay
uddhav mantarlay

मुंबई : राज्य सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यात पाच एप्रिलपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच दिवसा जमावबंदीचा आदेश जारी होणार आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत नवे निर्बंध लागू राहणार आहेत. याशिवाय शनिवारी आणि रविवारी कडक लाॅकडाऊन राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

राज्य मंत्रीमंडळाची या संदर्भात आज बैठक झाली. त्यात यासंदर्भात निर्णय घेण्यात आले. यातील काही निर्बंध पुण्यासह अनेक जिल्ह्यांत या आधीच लागू झालेले आहेत. 

सर्व खासगी कार्यालयांन `वर्क फ्रॉम होम` करण्याचे आदेश, बँक, इन्शुरन्स यांना मात्र सूट देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात ही अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय कार्यालयात ही 50 % वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेण्यात आला आहे.

Lock Down म्हटले की जनतेत घबराट पसरते. त्याऐवजी stop the chain ही भूमिका आता सरकारने घेतली आहे. रात्रीच्या वेळी No movements असे धोरण राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी (उदा. बागा, उद्याने) जाण्यास रात्री आठनंतर पूर्णपणे मनाई राहील. दिवसासुद्धा गरज पडल्यास ही ठिकाणी बंद राहतील. माॅल, दुकाने ही सुद्धा 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. सार्वजनिक वाहतूक सेवा चालू राहील. मात्र त्यावर काही बंधने येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. खासगी वाहतूक सेवाही चालू ठेवण्यात येणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. 

सिनेमा शूटिंग सुरू राहणार. आठवडे बाजार बंद राहणार

रेस्टाॅरंट आणि बार पूर्णपणे बंद राहणार (पार्सल सेवा सुरू राहणार)

हाॅटेलमध्ये वास्तव्यास असणाऱ्यांपुरते अन्न शिजविण्यास मान्यता. पार्सल सेवा फक्त सुरू राहणार

धार्मिक आस्थापना पूर्ण बंद राहणार

ब्यूटी पार्लर, केश कर्तनालये बंद राहणर

राजकीय सभा, समारंभ यांनाही बंदी

मनोरंजनासाठी सभागृहे बंद राहणार

लसीकरणासाठी मोठी केंद्रे उभारणार

राज्य सरकार यासाठीची नवीन नियमावली तातडीने जारी करणार आहे. त्यानंतर आणखी बाबी स्पष्ट होतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com